अंकिता देशकर

Amir Khan Lala Amarnath Movie First Photo: थ्री इडियट्स सारख्या रेकॉर्ड ब्रेकिंग चित्रपटांचे निर्माते राजकुमार हिरानी हे भारतीय क्रिकेटचे दिग्गज ‘लाला अमरनाथ’ यांच्यावर बायोपिक बनवण्याचा विचार करत आहेत अशा चर्चा मागील काही दिवसांपासून जोर धरत आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटात लाला अमरनाथ यांचे पात्र साकारण्याची संधी आमिर खानला देण्यात आली आहे असेही सांगण्यात येत आहे.अलीकडेच सोशल मीडियावर अमीर खानचा याच चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा लुक दाखवत असल्याचा दावा करत एक फोटो मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहे.

Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
janhvhi kapoor share her paintings
जान्हवी कपूर आहे उत्कृष्ट चित्रकार, रेखाटलं सुंदर चित्र; तुम्हालाही काढायचं आहे? जाणून घ्या तज्ज्ञांच्या टिप्स
Kedar shinde suraj Chavan jhapuk jhupuk movie muhurta photos viral
केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ चित्रपटाचा मुहूर्त पार पडला, सूरज चव्हाणसह मालिकाविश्वातील ‘हे’ लोकप्रिय चेहरे झळकणार
zakir hussain account first post after demise
झाकीर हुसैन यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर कुटुंबियांकडून पोस्ट; ‘तो’ खास फोटो शेअर करत लिहिलं…
Nana Patekar Aamir Khan Video viral
Video: मैत्री असावी तर अशी! नाना पाटेकर व आमिर खानचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, नेटकरी साधेपणाचं करताहेत कौतुक
Reshma Shinde
Video: सुंदर सजावट अन् फुलांची उधळण; रेश्मा शिंदेने शेअर केला हळदीचा व्हिडीओ
Uddhav Thackeray Ashok Chavan
“तुम्ही किंवा तुमच्या तीर्थरुपांनी…”, अशोक चव्हाणांचा तो फोटो पाहून ठाकरे गटाचा संताप; म्हणाल्या, “खायचं कुडव्याचं अन्…”

काय होत आहे व्हायरल?

ट्विटर यूजर syedzada यांनी व्हायरल फोटो त्यांच्या प्रोफाईलवर शेअर केला आणि असा दावा केला की राजकुमार हिरानी यांची आगामी बायोपिक ‘लाला अमरनाथ’ मधील आमिर खानचा हा लूक आहे.

इतर सोशल मीडिया वापरकर्ते देखील हाच दावा करत फोटो पोस्ट करत आहेत.

तपास:

फोटोचे बारकाईने निरीक्षण करून आम्ही आमचा तपास सुरू केला. लाला अमरनाथ हे क्रिकेटपटू होते पण व्हायरल झालेल्या फोटोमध्ये आमिर खानचा लुक क्रिकेटपटू नाही तर आर्मीच्या अधिकाऱ्यासारखा दिसत आहे. आम्हाला या चित्रात एक वॉटरमार्क देखील दिसला, या चित्राच्या खाली, Amir Khan as Leslie Groves असे लिहले होते तर चित्राचे श्रेय @wild.trance यांना दिले होते.

आम्ही त्यानंतर wild.trance यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स चा तपास सुरु केला.

आम्हाला @wild.trance यांचे इंस्टाग्राम प्रोफाइल सापडले. पेज च्या बायो मध्ये लिहले होते: Beauty of Ai Art

आम्हाला २२ जुलै रोजी केलेल्या पोस्टमध्ये आमिर खानचे हा फोटो सापडला.

तसेच या पेजवर इतर बॉलीवूड कलाकारांचेही AI निर्मित केलेले फोटो होते. हे AI वापरून बनवले आहे का हे तपासण्यासाठी आम्ही नंतर हायव्ह मॉडरेशनमध्ये इमेज अपलोड केली. तसेच हा फोटो आम्ही AI तपासणाऱ्या वेबसाईटवर पडताळला असता वेबसाइटने म्हटले आहे की इनपुट 99.9% एआय द्वारे निर्मित असल्याची शक्यता आहे.

हे ही वाचा<< वंदे भारत एक्सप्रेसचा नवा लुक पाहिलात का? ट्रेन तर तीच आहे पण जरा बारीक नजरेने बघा काहीतरी वेगळं दिसेल

निष्कर्ष: आमिर खानचा व्हायरल होत असलेला फोटो लाला अमरनाथ या त्याच्या आगामी बायोपिकमधील असल्याचे सांगून शेअर होत आहे पण मुळात हा फोटो AI निर्मित आहे.

Story img Loader