देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचा आज वाढदिवस. २२ ऑगस्ट १९६४ साली जन्मलेल्या अमित शाह यांचा राजकारणामधील वाटचाल ही थक्क करणारी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कार्यकर्ता म्हणून त्यांनी राजकीय प्रवासाला सुरुवात केली. १९८७ साली त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. २०१४-१९ काळात ते भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्षही राहिले आहेत. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर अगदी मोठ्या नेत्यांपासून ते सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत अनेकजण शुभेच्छा देताना दिसत आहेत. अमित शाह यांच्या सार्वजनिक आयुष्याबरोबरच खासगी आयुष्यातील काही गोष्टींचा उलगडा करणारं एक पुस्तक काही महिन्यांपूर्वी प्रकाशित झालं. या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने अमित शाह यांच्या खासगी आयुष्यातील यापूर्वी कधीही न ऐकलेले किस्से त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले होते.

अमित शाह यांच्या राजकीय प्रवासासंदर्भात भाष्य करणारं पुस्तक एप्रिल महिन्यात प्रकाशित झालं. ‘अमित शाह आणि भाजपाची वाटचाल’ या पुस्तकाचं प्रकाशन याच वर्षी २७ एप्रिल रोजी मुंबईमध्ये झाले. मराठीमध्ये भाषांतर करण्यात आलेल्या पुस्तकाचं प्रकाशन तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे नेते प्रवीण दरेकर, अभिनेत्री पल्लवी जोशी यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलं होतं. या प्रकाशन सोहळ्यामध्ये सर्वच मान्यवरांनी अमित शाहांच्या व्यक्तीमत्वाचे पैलू उलगडून सांगितले होते. देवेंद्र फडणवीस यांनीही अमित शाहांबद्दल बोलताना जवळजवळ २० मिनिटांचं भाषण केलेलं. यामध्ये फडणवीस यांनी अमित शाहांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल भाष्य करतानाच त्यांच्या खासगी आयुष्यातील एक महत्वाची गोष्ट सांगितली होती.

tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Shahrukh Khan
“अबराम व आर्यनचा…”, शाहरुख खान दोन्ही मुलांसह एकत्र काम करणार; अनुभव सांगत म्हणाला…
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Shashank Arora
“आम्ही वाळवंटात भारत-पाकिस्तानच्या बॉर्डरजवळ…”, इरफान खान यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत अभिनेता म्हणाला, “मला पतंग…”
Salman Khan
‘दबंग’ रिलोडेड लाइव्ह कॉन्सर्टसाठी सलमान खान सज्ज; म्हणाला, “स्टेजवर जाण्याआधी कपडे…”
Allu Arjun
वाढलेल्या दाढीमुळे बाप-लेकीच्या नात्यात दुरावा; अल्लू अर्जुन म्हणाला, “मी मुलीला…”
Arif Mohammed Khan
Arif Mohammed Khan : केरळचे राज्यपाल आरिफ खान यांचं भगवद्गीतेबद्दल मोठं विधान; म्हणाले, “हा भारताचा…”

फडणवीस यांनी या कार्यक्रमामध्ये बोलताना अमित शाह कितीही व्यस्त असले तरी रोज रात्री नऊ ते साडेनऊच्या दरम्यान एका खास व्यक्तीला फोन करुन गप्पा मारतात असं म्हटलं होतं. विशेष म्हणजे असा एकही दिवस जात नाही की अमित शाह या व्यक्तींशी बोलत नाहीत, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. या व्यक्तीसंदर्भातील उल्लेख या पुस्तकात असल्याचं फडणवीस म्हणाले होते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही व्यक्ती कोण आहे? ही व्यक्ती अमित शाहांच्या कुटुंबातील आहे.

अमित शाह हे जितके कणखर आहेत तितकेच त्यांच्या व्यक्तीमत्वाचे इतरही पैलू आहेत असं फडणवीस यांनी या कार्यक्रमात सांगितलं होतं. अगदी २०१८-१९ च्या कालावधीमध्ये भारतरत्न लता मंगेशकर यांची भेट घेतल्यानंतर अमित शाह त्यांच्यासोबत ज्यापद्धतीने गाण्यांवर गप्पा मारत होते ते पाहून मला आश्चर्य वाटल्याचंही फडणवीस म्हणाले होते. पुढे बोलताना फडणवीस यांनी पुस्तकामधील एक संदर्भ दिलेला. “अमित शाह म्हटल्यानंतर एक अतिशय कणखर अशाप्रकारचं व्यक्तीमत्व आपल्याला पहायला मिळतं. कणखर तर ते आहेतच. पण त्यासोबत ते तेवढेच संवेदनशीलही आहेत,” असं फडणवीस म्हणाले होते.

पुढे बोलताना फडणवीस यांनी, “या पुस्तकामध्ये आपल्याला आणखीन एक उल्लेख आपल्याला पहायला मिळतो. अमित शाह किती व्यस्त असेल तरी रात्रीच्या वेळी ते त्यांची नात आहे ऋद्री हिच्याशी फोनवर बोलल्याशिवाय एकही दिवस ते राहत नाहीत,” असं सांगितलं होतं. “रात्री नऊ साडेनऊच्या दरम्यान तिला ते रोज कॉल करतात आणि तिच्याशी रोज बोलतात. ही त्यांची कुटुंबवत्सल असल्याची बाजू देखील आपण समजून घेतली पाहिजे,” असं फडणवीस यांनी सांगितलं होतं.

Story img Loader