सोशल मीडियावर आपली कोणी दखलच घेत नाही म्हणून कोणी याची तक्रार थेट पंतप्रधानांकडे केलेली पाहिलीय का? सध्या सोशल मीडियावर याचीच चर्चा आहे. एका मुलीने याची थेट तक्रार मोदी आणि अमित शहा यांच्याकडे केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा अनेकांच्या ट्विटची उत्तरं देतात. पण मला मात्र या दोघांनीही प्रतिसाद दिला नाही. हे सगळे एकमेकांना सामील आहेत आणि आमच्याविरुद्ध कट रचत आहेत’ असे ट्विट नूपर या सोशल मीडिया अकाऊंटवरून करण्यात आलं आहे. आता दुर्लक्ष करण्याची तक्रार थेट त्यांच्याकडे केली म्हटल्यावर अमित शहांनी लगेचच तिला उत्तर देऊन टाकले. युपीच्या निवडणुका जिंकल्याने अमित शहा सध्या जास्तच खुश आहेत त्यामुळे दुर्लक्षित केल्याचा आरोप केलेल्या  या मुलीला त्यांनी लगेच उत्तर दिले.’धन्यवाद नूपर, आता यासाठी तुम्हाला उपोषण करण्याची गरज नाही’ असे खोचक ट्विट अमित शहांनी केले आहे. आतापर्यंत अनेक ट्विटर युजर्सनी मोदींना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत, पण आपल्याला नाही दिल्यात म्हणून तिने ट्विट केले होते.