राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे. काही आठवड्यांपूर्वीच फडणवीस हे राज्याचे भावी मुख्यमंत्री होतील असं वाटत असतानाच अचानक मुख्यमंत्रीपदाची माळ शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचं नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात पडली. सत्ता नाट्याच्या दुसऱ्या भागामध्ये फडणवीस यांना केंद्रीय नेत्यांच्या निर्देशानुसार उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांमुळे फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद मिळालं नाही अशी चर्चा दिल्लीपासून नागपूरपर्यंत रंगल्याचं पहायला मिळालं.

नक्की पाहा >> सकाळीच आलेला अमित शाहांचा फोन, मराठा- ब्राह्मण समीकरणं अन् फडणवीसांच्या हातून निसटलेलं मुख्यमंत्रीपद; जाणून घ्या घटनाक्रम

जातीय समीकरणं आणि सत्तास्थापनेची तडजोड करण्यासाठी फडणवीसांना राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे पद देण्यात आल्याची नाराजी फडणवीसांचा बालेकिल्ला असणाऱ्या नागपूरमध्ये पहायला मिळाली. नागपूरमध्ये फडणवीस यांचं अभिनंदन करणाऱ्या पोस्टर्स, बॅनर्सवरुन अमित शाह यांचा फोटो गायब होते. या साऱ्या नाट्यानंतर आज फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त अमित शाह यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना केवळ शुभेच्छाच दिल्या नाहीत तर त्यांचं कौतुकही केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना शाह यांनी आपल्या ट्वीटमध्ये त्यांचं तोंडभरुन कौतुक केलं आहे.

नक्की पाहा >> Photos: ‘फडणवीसांच्या पत्नीनेच…’, ‘कागद लिहून…’, ‘गुजरात, गुवाहाटी, गोव्यात…’, ‘फोडाफोडी करून जे..’; पवारांची फटकेबाजी

ट्वीटरवरुन फडणवीस यांना शुभेच्छा देताना शाह यांनी, “महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा,” असं म्हणलं आहे. याच ट्वीटमध्ये शाह यांनी फडणवीस यांचं महाराष्ट्रातील भाजपाच्या राजकारणामध्ये आणि मोदींच्या नेतृत्वातील सत्ताकारणामध्ये मोलाचं योगदान राहिल्याचं म्हटलंय. “मोदीजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राच्या विकासाला प्राधान्य देण्यात आणि पक्षाला बळकटी देण्यासाठी तुमचं योगदान मोलाचं आहे,” असं शाह ट्वीटमध्ये म्हणालेत. “तुम्हाला निरोगी आणि दिर्घ आयुष्य लाभो आणि अशाच प्रकारे मन लावून व उत्साहाने तुम्ही लोकांचा सेवा करत राहा अशी इच्छा व्यक्त करतो,” असं म्हणत शाह यांनी शुभेच्छा दिल्यात.

नक्की पाहा >> Photos: दिल्लीतही शिंदे गट? भाजपा अजून एका ‘मास्टरस्ट्रोक’च्या तयारीत; केसरकर म्हणाले “…तेव्हा उद्धव ठाकरेसुद्धा ऐकतील”

“माननीय अमित शाह यांचे या प्रेमळ शुभेच्छांसाठी मी आभार मानतो. तसेच त्यांचा सदैव असणारा पाठिंबा आणि मार्गदर्शनासाठीही आभार मानतो,” असा रिप्लाय फडणवीस यांनी या ट्वीटला दिलाय.

फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मर्जीतील असले तरी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी फारसे सख्य नाही. देवेंद्र फडणवीस यांना भाजपामधील काही नेत्यांनी विरोध केल्याने आणि पुन्हा ब्राह्मण मुख्यमंत्री करता येणार नाही, असे जातीय समीकरणांचे कारण देत भाजपा पक्षश्रेष्ठींनी फडणवीस यांना झटका दिल्याचं राज्यातील सत्तानाट्यानंतर सांगण्यात आलं. फडणवीस यांचा शब्द महाराष्ट्रात अंतिम असतो, असे समीकरण रूढ झाले होते. ते मोडून काढून अमित शाहांच्या माध्यमातून पक्षनेतृत्वाने फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद देऊन धक्का दिल्याचेही मानले जात आहे.

Story img Loader