‘गॅलेक्सी नोट ७’ या मोबाईलमुळे सॅमसंगची जगभरात नाचक्की होत असतानाच या फोनमधील सदोष बॅटरीचा फटका खुद्द बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांना बसला आहे. त्यामुळे माझा फोन १०० टक्के चार्ज कधी होईल असा सवालच बिग बींनी सॅमसंगला विचारला आहे.
सॅमसंगने नुकताच ‘नोट ७’ हा फोन गाजावाजा करत बाजारात लाँच केला होता. या फोनची भूरळ बिग बींनाही पडली आणि त्यांनी तो फोन घेतला. पण आता हा फोन बिग बींसाठी डोकेदुखी ठरल्याचे दिसते. त्यामुळे ट्विट करत त्यांनी सॅमसंगवर हल्ला चढवला आहे. ‘आपल्याकडे असलेल्या ‘नोट ७’ ची बॅटरी मर्यादा ६० टक्क्यांपर्यंत दाखवते, त्यामुळे माझा फोन हा १०० टक्के चार्ज कधी होणार ? असा सवाल त्यांनी विचारला आहे. पुढे ‘मिस्टर सॅमसंगने’ म्हणजेच या कंपनीने त्यांच्या प्रश्नाचे लवकरात लवकर उत्तर देण्याची विनंतीही त्यांनी केली आहे.
आपल्या ट्विटर अकाउंटवरून त्यांनी ट्विट केले आहे. या ट्विटसोबत त्यांनी आपला काळ्या सुटा बुटातला फोटो देखील जोडला आहे. पण अजूनही सॅमसंगकडून अमिताभ बच्चन यांना कोणतीच प्रतिक्रिया आली नाही त्यामुळे बच्चन यांना सॅमसंग काय उत्तर देईल याकडे सगळ्याचे लक्ष आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून सॅमसंगच्या याच मोबाईल फोनमध्ये बॅटरीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. या मोबाईमधल्या बॅटरीचा स्फोट होतो किंवा काही मोबाईल पेट घेत आहेत अशा अनेक घटना समोर आल्या आहे. बॅटरी डिफेक्ट असल्याने सॅमसंगने ग्राहकांकडून हे फोन परत मागवले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा