Amitabh Bachchan Viral Video: सध्या सर्वत्र आयपीएलचे वारे वाहत आहेत. भारतीयांसाठी क्रिकेट हा अत्यंत जवळचा व जिव्हाळ्याचा मानला जातो. अगदी राजकारणी मंडळी ते सेलिब्रिटी सर्वांनाच क्रिकेटविषयी विशेष प्रेम आहे. म्हणूनच बहुतांशवेळा सेलिब्रिटी सुद्धा आपल्या लाडक्या खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी स्टेडियम मध्ये उपस्थित असतात. असेच एक खास क्रिकेटप्रेमी म्हणजे स्वतः महानायक बिग बी, म्हणजेच अमिताभ बच्चन. बच्चन यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एका खास चिमुकल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओला कॅप्शन देताना अमिताभ यांनी भारताच्या क्रिकेटचे भविष्य हे उत्तम हातात असल्याचे म्हणत विश्वास दाखवला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी सचिन तेंडुलकर, सूर्यकुमार यादव, विराट कोहली यांचे मजेशीर स्टिकर्स शेअर केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेल्या Video मध्ये आहे तरी काय?

अमिताभ बच्चन यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एका चिमुकल्या क्रिकेटरचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा लहान मुलगा आपल्याच घराच्या पडवीत क्रिकेट खेळतोय असे बघण्यावरून वाटतेय. हातात इवलीशी बॅट घेऊन स्ट्राईकवर उभा असलेला हा चिमुकला समोरून वेगाने येणाऱ्या चेंडूला असा काही टोलवतो एका फटक्यात हा बॉल दूर निघून जातो. हा शॉट मारताना या बाळाची स्टाईल अगदी धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटसारखीच वाटत आहे. अमिताभ यांनी या व्हिडिओला कॅप्शन देताना, “भारतीय क्रिकेटचे भविष्य अगदी सुरक्षित हातात आहे” असा विश्वास दर्शवला आहे.

हे ही वाचा<< सचिन तेंडुलकरने भेट दिलेल्या कोकणातल्या फार्म स्टेची झलक; दिवसाचे भाडे, जेवणाची सोय व पॅकेज जाणून घ्या

दरम्यान, या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करून हा चिमुकला भारतातील नसून पाकिस्तानातील आहे असेही सांगितले आहे. या प्रकारच्या कमेंट्सवरून वेगळाच गोंधळ सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये पाहायला मिळत आहे पण असं असूनही जवळपास सर्वांनीच या चिमुकल्याच्या टॅलेंटचं मात्र तोंड भरून कौतुक केलंय. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan shares video of little boy cricket indias future people shared sachin tendulkar photo says he is from pakistan svs
Show comments