भारतामध्ये आजपर्यंत अनेक अविष्कार निर्माण झाले आहेत आणि हे सर्वज्ञात आहे. शास्त्रज्ञच नव्हे तर सामान्य माणूसही काहींना काही अविष्कार तयार करत असतो. आज पर्यंत सामान्य माणूस काही ना काही जुगाड करुनच आपल्या गरजा पूर्ण करत आला आहे. असाच एक देशी जुगाड सध्या चर्चेत आला आहे. उन्हाळ्यातील वाढत्या तापमानाला वैतागलेल्या एका व्यक्तीने भर उन्हात चक्क थंडगार हवेची सोय केली आहे. या व्यक्तीचा देशी जुगाड पाहून सुपरस्टार अमिताभ बच्चन देखील थक्क झाले आहेत.

देशी जुगाड पाहून अमिताभ बच्चन झाले थक्क

गेल्या अनेक वर्षांपासून सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या अनेक उत्तमोत्तम चित्रपटांनी आपल्याला भुरळ घातली आहे आणि 40 वर्षांहून अधिक काळ सिनेविश्वात राहून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. अनेकदा व्हि-लॉग्सच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांशी संवाद साधत असतात आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अॅक्टिव्ह असतात.

raining in Akola district during the winter season
अकोला: ऐन हिवाळ्यात पावसाचा तडाखा; वातावरणातील बदलाने…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Dr. Manmohan Singh passes away at 92
Manmohan Sing Death : मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, “माझे आदर्श आणि मार्गदर्शक..”
Sushma Swaraj And Manmohan Sing News
Manmohan Sing : मनमोहन सिंग आणि सुषमा स्वराज यांच्यातल्या शायरीच्या जुगलबंदीने जेव्हा गाजली होती लोकसभा
ishwar allah tero naam bhajan news
Protest on Bhajan: ‘ईश्वर अल्लाह तेरो नाम’ भजनावर आक्षेप घेत घोषणाबाजी; अटल बिहारी वाजपेयींच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात गोंधळ!
dhananjay munde valmik karad santosh deshmukh murder
Dhananjay Munde: “हे असले बॉस?” धनंजय मुंडेंचं हातात पिस्तुल घेतलेलं रील शेअर करत अंजली दमानियांची पोस्ट; ‘त्या’ व्हिडीओचाही समावेश!
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
mohan bhagwat in disputed religious land
Mohan Bhagwat: मोहन भागवतांच्या भूमिकेशी ‘दी ऑर्गनायझर’ची फारकत; म्हणे, “वादग्रस्त धार्मिक स्थळांचं सत्य समोर आलंच पाहिजे!”

व्हिडिओ पाहून बिग बी म्हणाले, ‘भारत आविष्काराची जननी!’

सोशल मिडियावर एक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे ज्याची दखल चक्क बिग बी यांनी घेतली आहे. या व्हिडिओमध्ये एक वृद्ध व्यक्ती आपल्या डोक्यावर समोर पंखा आणि मागे सौर पॅनेलसह हेल्मेट घालून फिरतो आहे. उन्हाच्या झळांपासून वाचण्यासाठी या व्यक्तीने तयार केलेला हा देशी जुगाड पाहून अमिताभ बच्चन देखील या व्यक्तीचे कौतूक करण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाहीत. 3 एप्रिलला बिग बींनी एक व्हिडिओ शेअर केला आणि कॅप्शनमध्ये म्हटले की, ”भारत आविष्काराची जननी! भारत माता की जय!” आहे.

हेही वाचा : ट्रेनमधून सामान चोरीला गेले तर काय करावे? रेल्वे देते नुकसान भरपाई, करा हे काम

डोक्यावर सोलर प्लँट आणि पंखा लावा, भर उन्हात घ्या थंड हवेचा आनंद

भर उन्हात थंड हवा मिळविण्यासाठी या अवलियाने हा देशी जुगाड केला आहे. डोक्यावर सोलर पॅनल आणि पंखा लावून या वृद्ध व्यक्तीने सोलर फॅन तयार केला आहे जो तो स्वत:सोबत घेऊन फिरतो आहे. हा व्हिडिओ उत्तर प्रदेशमधील लखीमपुर जिल्ह्यातील आहे.

व्हिडिओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक यूजर्सने कमेंट केली आहे की, ‘उन्हात थंड हवा कशी येऊ शकते” तर आणखी एका युजरने कमेंट केली की, ”याला म्हणतात जुगाड अमिताभ जी!”

Story img Loader