आयपीएल संपलीय आणि आता हिरा ठाकूर पुन्हा एकदा सेट मॅक्सच्या दिशेने रवाना झालाय. काय हे ऐकून घाम फुटलाय? हातपाय थरथरायला लागेत? पण आता आपण काहीच करू शकत नाही कारण पुढचे ३६५ दिवस ‘सूर्यवंशम्’चा ‘ अत्याचार’ सहन करण्याची ‘मानसिक’ तयारी करण्यावाचून आपल्याजवळ कोणताच पर्याय उरला नाही हे सत्य आपण नाकारू शकत नाही.

पण काय योगायोग बघा ना! २१ मे १९९९ मध्ये ‘सूर्यवंशम्’ Sooryavansham प्रदर्शित झाला होता आणि या २१ मेला हा चित्रपट प्रदर्शित होऊन १८ वर्षे झालीत. तेव्हा बीग बीने खुद्द ट्विट करत ही माहिती शेअर केली. पण चाहत्यांनी आनंद व्यक्त करण्यापेक्षा कपाळावर हातच मारला. आता आयपीएलचे IPL दहावे पर्व संपले आणि ‘सूर्यवंशम्’ ला अठरा वर्षे पूर्ण झालं याचा  आनंद मानायचा की
आजपासून आठवड्यातून किमान चार पाच वेळा हा चित्रपट बघण्याचा ‘अत्याचार’ सहन करण्याचे दु:ख कुरवाळत बसायचं हेच कळेनासं झालंय. तेव्हा सूर्यवंशम् सेट मॅक्सवर परत येणार या धक्क्याने नेटिझन्स असे काही चक्रावून गेलंत की ट्विटरवर नुसता एकापेक्षा एक विनोदाचा कल्लाच पाहायला मिळतोय.

Story img Loader