Viral Video : सोशल मीडियावर अनेक हटके व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. कधी कोणी गाणी म्हणताना दिसतात तर कधी कोणी डान्स करताना दिसतात. काही लोक त्यांच्या आजुबाजूला दिसणारे हटके व्हिडीओ शेअर करतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अमरावतीचा ऑटो चालक इंग्रजीमध्ये बोलण्याचा सल्ला देताना दिसतात. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही तुम्हीही अवाक् व्हाल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल एक ऑटो चालक काका दोन तरुणांना इंग्रजीचे महत्त्व पटवून सांगतात. एक तरुण त्यांच्या रिक्षामध्ये बसला आहे तर दुसरा तरुण त्यांचा व्हिडीओ शूट करताना दिसत आहे. काका इंग्रजीमध्ये बोलत इंग्रजी किती महत्त्वाची आहे, हे समजून सांगताना दिसतात. त्याची स्पष्ट इंग्रजी पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ अमरावती शहरातील आहे.

हेही वाचा : अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्यामुळे वाहतूक मार्गांत बदल; ट्रॅफिक ॲडव्हायजरी पाहून संतापले लोक, म्हणाले, “सरकारने मुंबईत…”

या व्हिडीओवर लिहिलेय, “आज मी एक गृहस्थाला भेटलो जो ऑटो चालक आहे. त्यांच्याबरोबर आम्ही मजेशीर संवाद साधला पण माझ्यासाठी हे खूप आश्चर्यकारक होते की ते खूप स्पष्टपणे इंग्रजी बोलत होते आणि इंग्रजी भाषा शिकण्याचा प्रयत्न करा, असे आवाहनही करत होते.” इंग्रजीविषयी असलेली काकांची ओढ पाहून तुम्हीही प्रेरित व्हाल.

पाहा व्हायरल व्हिडीओ

kon_bhushan1222 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मी सुद्धा थक्क आणि नि:शब्द झालो. त्यांची स्पष्ट इंग्रजी पाहून मला आश्चर्य वाटले”

हेही वाचा : पीठ न मळता पोळ्या करण्यासाठी तरुणांचा जुगाड; मिक्सरच्या भांड्याचा केला असा उपयोग की… VIDEO पाहून हसून व्हाल लोटपोट

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “१६ वर्ष शिक्षण घेऊन सुद्धा त्यांची इंग्रजी माझ्यापेक्षा खूप चांगली आहे” तर एका युजरने लिहिलेय, “या वयात किती आत्मविश्वास आहे काकांना” आणखी एका युजरने लिहिलेय, “आनंद असा वाटला शिक्षण घेऊन आपण नोकरी ऐवजी स्वतःचे काम चालू करू शकतो आणि तुमच्या या व्हिडिओमुळे नवीन पिढीला हा खूप मोठा संदेश मिळाला दादा. आपले खूप खुप धान्यवाद” व्हिडीओ पाहून काही युजर्सना एपीजे अब्दुल कलाम यांची आठवण आली आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amravati auto driver speaks fluent english and suggest people why we need to speak in english ndj
Show comments