Amravati Couple Dancing Viral Video: एक व्हायरल रील एखाद्या व्यक्तीचं आयुष्य कसं बदलून टाकू शकते याची एक ना अनेक उदाहरणे आपल्या समोर आहेत. अगदी कच्चा बदाम गाण्यावर व्हायरल झालेली तरुणी असो ते कुंभ मेळ्यातील मोनालिसा असो. आता सिनेसृष्टीत सुद्धा याच व्हायरल स्टार्सना वेगळाच भाव मिळाला आहे. थोडक्यात काय तर एक रील माणसाला प्रचंड प्रसिद्ध व प्रचंड श्रीमंत करू शकते. पण आता समस्या ही आहे की रील व्हायरल करायची कशी याचं काही साधं गणित नाही त्यामुळे प्रत्येकजण आपल्याला जमेल ते सगळे उपाय वापरून आपला ३० सेकंदाचा व्हिडीओ तरी व्हायरल व्हावा यासाठी धडपड करत असतो. दुर्दैवाने मागील काही काळात काहीच अर्थ नसलेल्या, खरंतर अविवेकी वाटणाऱ्या पण मोठ्या हिंमतीने केलेल्या रील व्हायरल झाल्याची उदाहरण डोळ्यासमोर लगेच येत असल्याने काही विचार करून बनवण्याच्या फंदात पडण्यापेक्षा केवळ लोकांना ‘मूर्ख’ बनवणाऱ्या रील करणाऱ्यांची संख्या वाढलीये.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

रस्त्यात उतरलं, गर्दीला थांबवून दोन चार स्टेप्स करून दाखवल्या की लोक पाहतात हे काय नवीन नाही, अनेकांनी यापूर्वी आपली ‘रोजी रोटी’ यामार्गाने कमावलीये. कधीकाळचा तो नाईलाज आता व्हायरल रीलचा गाभा झाला आहे. सध्या सोशल मीडियावर सुद्धा अशाच एका रीलस्टारच्या रील्सची चर्चा सुरु आहे. अमरावतीच्या रस्त्यावर उतरून या व्यक्तीने एका महिलेसह नाचतानाचे रील पोस्ट केले आहेत. मागे ढिंचॅक गाणी लावून ही व्यक्ती व साडी नेसलेली महिला चक्क थांबलेल्या गाड्यांपुढे व गर्दीपुढे नाचताना दिसतेय. याच प्रकारच्या अन्यही अनेक रील त्यांच्या अकाउंटवर आहेत. इंस्टाग्राम अकाउंट देविदास इंगोले यावरून या रील पोस्ट करण्यात आल्या आहेत.

नाही म्हणायला या रीलवर अनेकांनी लाईक्स व व्ह्युजचा पाऊस सुद्धा पाडलाय. पण कमेंट्स सेक्शनमध्ये मात्र लोक चांगलेच भडकलेले पाहायला मिळतायत. संबंधित रील अमरावती शहरातील रस्त्यावर शूट केलेल्या असाव्यात अशी माहिती कमेंट्समधून मिळतेय. या दोघांनी यापूर्वी सुद्धा अनेक सिग्नल्सच्या इथे नाचताना रील बनवल्यात. यांच्यामुळे गाड्यांचा खोळंबा होतो असं म्हणत काही कमेंट्समध्ये या दोघांविरुद्ध तक्रार करण्यात आली आहे. तर काहींनी थेट अमरावती पोलिसांना टॅग करून तुम्ही अशा लोकांवर कारवाई का करत नाही असं म्हणत टीका केली आहे.

अमरावतीच्या रीलस्टारमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढणार?

दरम्यान, रीलवर कमेंट करताना काहींनी या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या जोडप्याची सुद्धा कानउघाडणी केली आहे. शाळकरी, कॉलेजियन्स मुलांसमोर अशाप्रकारे नाचून तुम्ही काय दाखवताय, अभ्यास न करता असले प्रकार करूनच भविष्य घडवणार आहेत का मुलं? अशा कमेंट्स करून नेटकऱ्यांनी या दोघांना सुनावलं आहे. तर पोलिसांनी सुद्धा अशा लोकांच्या विरुद्ध कारवाई केली नाही तर असे रोडरोमिओ सगळ्यांच्या नाकी नऊ आणतील असं म्हणत काहींनी आपली भीती व्यक्त केली आहे. आता सदर प्रकरणी खरोखरच काही कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण तुम्हाला या प्रकारच्या रील्सबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amravati couple dancing on road viral video people get angry after see this video sjr