सौजन्य: factcrescendo

Loksabha Elections Amravati Opinion Poll: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एबीपी माझा या न्यूज चॅनलचे लोगो असलेले ओपिनियन पोल सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यानुसार अमरावतीमध्ये काँग्रेसला सर्वात जास्त ४४ टक्के मते प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले आहेत. पोस्ट शेअर करताना युजर्स दावा करत आहेत की, व्हायरल ओपिनियन पोल एबीपी माझाने जाहीर केला आहे. मात्र पडताळणी नंतर याबाबत वेगळी माहिती समोर येत आहे.

Image Of India Alliance Leaders.
AAP vs Congress : “तर काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढायला लावू”; काँग्रेसला भाजपाकडून निधी, आपचे गंभीर आरोप
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Vijay Hazare Trophy Mumbai Beat Arunachal Pradesh by 9 Wickets Under Shardul Thakur Captaincy
Vijay Hazare Trophy: शार्दूल ठाकूरच्या नेतृत्वात मुंबईने उडवला अरुणाचलचा धुव्वा; अवघ्या ३३ चेंडूत जिंकला सामना
डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं? (फोटो सौजन्य पीटीआय)
BJP vs Congress : डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं?
IND vs AUS Boxing Day Test Sam Konstas hit six against Jasprit Bumrah after 4483 balls
IND vs AUS : १९ वर्षीय खेळाडूने जसप्रीत बुमराहविरुद्ध केला मोठा पराक्रम, ११४५ दिवसांनी मोडला खास विक्रम
Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, “२०१९ मध्ये मोठी गद्दारी…”
Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर
Important update regarding municipal elections in Maharashtra state
राज्यातील महापालिका निवडणुकीबाबत महत्वाची अपडेट, बावनकुळे म्हणाले…

काय आहे दावा ?

एबीपी माझाचा लोगो असणाऱ्या व्हायरल ग्राफिकमध्ये अमरावतीतील पक्षांनुसार मतदानचा अंदाज लावण्यात आला आहे. त्यामध्ये काँग्रेस ४४.३६, भाजप ३६. ११, प्रहार १३.१८ आणि अपक्ष व इतर ०६. ३५ टक्के मतदान दाखवण्यात आले आहे.

तपास:

शक्ती कलेक्टिव्ह अंतर्गत Fact Crescendo ने केलेल्या तपासानुसार, सर्व प्रथम एबीपी माझाच्या वेबसाईटवर आणि त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर हे ग्राफिक आढळले नाही.या उलट एबीपी माझाच्या फेसबुक आकाउंवर हे ग्राफिक कार्ड खोटे असल्याचे सांगण्यात आले आहे. पोस्ट शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “एबीपी माझाच्या नावे विविध लोकसभा मतदारसंघाच्या ओपिनियन पोलच्या खोट्या इमेज/स्क्रीनशॉट व्हायरल केले जात आहेत. या त्याचा एबीपी माझाशी काहीही संबंध नाही. या प्रकाराबाबत एबीपी माझा कायदेशीर कारवाई करणार आहे.”

https://marathi.abplive.com/news/politics

निष्कर्ष: यावरून सिद्ध होते की, व्हायरल ग्राफिक बनावट आहे. एबीपी माझाने स्पष्ट केले की, व्हायरल ओपिनियन पोल बनावट असून त्यांच्याद्वारे शेअर करण्यात आले नाही.

हे ही वाचा<< उद्धव ठाकरेंना काँग्रेसचे कार्यकर्ते बोलूच देईना? भरसभेत मंचावरील Video पाहून समर्थकांचा संताप, नेमकं काय घडलं?

अनुवाद: अंकिता देशकर

Story img Loader