अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे दाम्पत्य वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या नवनीत राणा लक्ष वेधत आहेत, ते म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्यांच्या एका व्हिडीओमुळे. अवघ्या काही दिवसांवर आलेल्या नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं गरबा आणि दांडिया नृत्याच्या प्रशिक्षण आणि सरावासाठीच अनेकांनी कंबर कसली आहे. अमरावतीतही अशाच एका शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी या शिबिरात सहभागी होत नवनीत राणा यांनी दांडिया नृत्य सादर केलं. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, व्हिडीओच्या निमित्तानं नवनीत राणा पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अमरावतीच्या सिटी सेंटरजवळ असलेल्या हरिश्चंद्र मंगलम लॉनमध्ये १० वर्षांपासून ‘विदर्भ गरबा किंग’च्या वतीने गरबा वर्कशॉपचं आयोजन करण्यात येतं. यंदाच्या या वर्कशॉपमध्ये अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनीसुद्धा सहभाग घेत गरब्याचा आनंद घेतला. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अतिशय सराईत व्यक्तीप्रमाणे त्या हे नृत्य करताना दिसत आहेत. अमरावती येथील गरबा वर्कशॉपमध्ये त्यांचा हा अनोखा अंदाज पाहायला मिळाला. या शिबिरात सहभागी झालेल्या महिलांसोबत राणा यांनी धरलेला ठेका पाहून सर्वांनाच आनंद झाला.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> चुके काळजाचा ठोका…; तरुण चालत्या ट्रकमध्ये खेळतोय झोका; VIDEO पाहून लावाल डोक्याला हात…

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यांच्या नृत्याचा हा व्हिडीओ पाहता, खऱ्या अर्थाने नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे, असंच म्हणावं लागेल. नवरात्रोत्सव आता जेमतेम काही दिवसांवर आला आहे. देवीच्या आगमनाची सर्व तयारी आता जवळपास पूर्ण झाली असेल. नवनीत राणा तर रास गरबा आणि दांडियासाठी सज्ज झाल्या आहेत; पण तुमचं काय? नवरात्रोत्सवाच्या आनंददायी वातावरणासाठी तुम्ही तयार आहात ना?