पाळीव प्राण्यांमध्ये कुत्रा हा माणसांच्या जास्त जवळ असतो. कुत्रा माणसाप्रमाणेच मालकाला जीव लावतो त्यामुळे अनेक जणांचं कुत्र्यावर जास्त प्रेम असतं.आपल्या सभोवताली आपल्या प्राण्यांवर प्रेम करणारे आणि प्राण्यांना त्रास देणारे अशा दोन्ही प्रकारचे लोक आढळतात. कुकाही जण कुत्र्यांना अगदी जीवाप्रमाणे जपतात तर, काही जण मात्र याउलट असतात. ते रस्त्याने जात असतानाही विनाकारण कुत्र्यांना त्रास देतात.दरम्यान कुत्र्याला वाचवतानाचा एक व्हिडीओ अमृतसर पोलिसांच्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा हृदयस्पर्शी व्हिडिओ पाहून तुमचेही डोळे आनंदाने पाणावतील.
व्हिडिओमध्ये हेड कॉन्स्टेबल पलविंदर सिंग हे एका वाहनात अडकलेल्या भटक्या कुत्र्याला मदत करताना दिसत आहेत. सिंग त्या बिचाऱ्या कुत्र्याला गाडीतून बाहेर काढण्यासाठी काळजीपूर्वक आणि हळू हळू त्याची मान फिरवत आहेत. बऱ्याच प्रयत्नांनंतर कुत्र्याचं अडकलेलं डोक बाहेर काढण्यात यश येतं. या कुत्र्याच्या मदतीसाठी अमृतसर पोलिस अधिकारी मदतीसाठी आले. मोठ्या काळजीने आणि कौशल्याने, कुत्र्याला सुरक्षितपणे बाहेर काढले.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – समुद्राच्या मधोमध जहाजातून पाण्यात पडली महिला; बचाव कार्याचा अंगावर काटा आणणारा Video एकदा बघाच
पोस्टला आतार्यंत लाखो व्ह्यूज आणि अनेक प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. गाडीत अडकलेल्या प्राण्याला बाहेर काढण्यासाठी लोकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. तर बचाव करताना एवढा संयम दाखवल्याबद्दल अनेकांनी पोलीस अधिकाऱ्याचे कौतुक केले.