देशभरात करवा चौथ हा सण १ नोव्हेंबर रोजी मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला आहे. या सणानिमित्त विवाहित महिला पतीच्या यादीर्घायुष्यासाठी उपवास करतात. सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत पाणी आणि अन्नाशिवाय हा उपवास केला जातो. जरी पत्नी आपल्या पतींसाठी हे व्रत पाळत असल्या तर आज असे अनेक पती आहेत जे आपल्या पत्नीसह करवा चौथचे व्रत पाळतात. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातून समोर आला आहे. अमरोहामध्ये आरोग्य विभागाच्या एका कर्मचाऱ्याने करवा चौथला आपल्या पत्नीची सेवा करण्यासाठी आणि तिच्या दीर्घायुष्यासाठी उपवास ठेवण्यासाठी अनोख्या पद्धतीने सुट्टीसाठी अर्ज केला.
मागितली एक दिवसाची रजा
करवा चौथ सणाचा दाखला देत आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्याने पत्नीची सेवा करण्याच्या नावाखाली अचानक एक दिवसाची रजा मागितली. रजेबाबतचे हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अमरोहाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी कार्यालयात कनिष्ठ सहाय्यक म्हणून तैनात असलेल्या राजकुमार यांनी सीएमओला पत्र लिहून ही रजा मागितली होती.
“पत्नीची सेवा करायची आहे”
राजकुमाराने पत्रात लिहिले आहे की, “करवा चौथच्या दिवशी त्याला पहाटेपासून आपल्या पत्नीची सेवा करायची आहे, ज्यामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. त्या महान पत्नीच्या दीर्घायुष्यासाठी करवा चौथ व्रत पाळायचे आहे. यामुळे अर्जदार १ नोव्हेंबर रोजी कार्यालयात उपस्थित राहू शकत नाही. त्यामुळे, कृपया अर्जदाराची प्रासंगिक रजा मंजूर करा. राजकुमारचे हे पत्र त्याच्या एका मित्राने सोशल मीडियावर व्हायरल केले होते.
पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले
ही बाब त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर सीएमओने कर्मचाऱ्याला त्याच्या जबाबासाठी समन्स बजावले आहे. राजकुमार हा सीएमओ कार्यालयात कनिष्ठ सहाय्यक आहे. राजकुमार यांनी सोमवारी सीएमओला हे पत्र लिहिले होते. मात्र आरोग्य कर्मचारी राजकुमार यांना रजा मिळाली नाहीच. पण याप्रकारामुळे अधिकारीही चांगलेच संतापले. सीएमओने नोटीस देऊन राजकुमार या कृत्याबाबत स्पष्टीकरण मागवले आहे.