महाराष्ट्रातील विरोधीपक्ष नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सतत चर्चेत असतात. कधी त्यांच्या गाण्यांमुळे तर सोशल नेटवर्किंगवरील वक्तव्यांमुळे अमृता या चर्चेत असल्याचे चित्र पहायला मिळतं. सध्या अमृता फडणवीस या पुन्हा चर्चेत आहेत त्या अर्थसंकल्पामुळे. अमृता यांनी सोमवारी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेमुळे त्या ट्रोल होताना दिसत आहेत.

देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा २०२१-२२ चा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अमृता यांनी त्यासंदर्भात ट्विटरवरुन प्रतिक्रिया दिली होती. यामध्ये अमृता यांनी निर्मला यांचं कौतुक करताना, “मागील १०० वर्षांमध्ये कधी पाहण्यात आलं नाही अशापद्धतीने अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल श्रीमती निर्मला सीतारामन यांचे आभार. कराचा बोजा सर्वसामान्यांवर न टाकता विकासाला प्रेरणा कशी द्यायची हे आता सर्व देश आपल्याकडून शिकतील,” असं ट्विट अमृता यांनी केलं होतं.

ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Prashant Bamb BJP MLA
“मरेपर्यंत पस्तावशील, हे लोक तुला…”, भाजपा आमदाराची भर सभेत अरेरावी; प्रश्न विचारणाऱ्यांना कार्यकर्त्यांनी हुसकावलं
devendra fadnavis assured to farmers if rate is less than guaranteed price government will pay difference
“हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्यास फरकाची रक्कम सरकार देणार,” उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्‍वासन
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा
supriya sule on devendra fadnavis
“देवेंद्र फडणवीसांविरोधात आता खटला भरला पाहिजे, त्यांनी राज्यातील…”; छगन भुजबळांच्या ‘त्या’ दाव्यावरून सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल!
UPSC Preparation UPSC Mains Exam 2024 Overview of the question career
UPSC ची तयारी: UPSC मुख्य परीक्षा २०२४; प्रश्नाचे अवलोकन
What Devendra Fadnavis Said?
Devendra Fadnavis : “शरद पवारांनी दिलेला मंत्र आता…”, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य चर्चेत

नक्की वाचा >> गाण्यावरील ट्रोलिंगमुळे निराश व्हायला होतं का?; अमृता फडणवीस म्हणतात… 

Soon, Twitter users wondered if they were missing something as India got independence 74-years-ago. How then could this budget have been ‘ never-seen-in-100-years’, wondered many users.

मात्र अमृता यांच्या या ट्विटनंतर अनेकांनी त्यांना भारताला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षच झाली आहेत अशी आठवण करुन दिली. देश स्वतंत्र होऊन ७४ वर्ष झाली असतानाच १०० वर्षात पाहिलं नाही असा उल्लेख अमृता यांनी का केला असावा यावरुनच अनेकांनी त्यांना प्रश्न विचारत ट्रोल केलं. “आपण नक्की भारतीय आहात का? आपल्या या विधानावरून हा प्रश्न उपस्तीत होतो. भारत स्वतंत्र होऊन ७३ वर्ष झाली आणि ह्यांनी १०० वर्षांतील कोणते बजेट पाहिले आहेत. यांनी जनतेला पागल बनवायचा धंदा सुरू केला आहे वाटत. नवरा जनतेला गाजर दाखवतो आणि ही बाई जनतेला जोक्स सांगते,” असा टोला अनुज गायकवाड या तरुणाने अमृता यांच्या ट्विटला उत्तर देताना लगावला आहे.

नक्की वाचा >> …म्हणून मी राजकारणात येण्याच्या योग्यतेची नाही; अमृता यांनी सांगितली ‘मन की बात’

Another Twitter user Samadhan Jagtap took a swipe saying, “Maybe we were taught the wrong history. You are right … Let’s have a song on the budget.”

तर समाधान जगताप या तरुणाने अमृता यांचा उल्लेख मामी असा करत देश स्वतंत्र होऊन ७५ वर्षही पूर्ण झाले नसल्याचं म्हटलं आहे. तसेच बजेटवर अमृता यांनी एखादं गाणं करावं असंही या तरुणाने म्हटलं आहे.

अन्य एका युझरने १०० वर्षातील सर्वात चांगला अर्थसंकल्प असं म्हणणाऱ्या अमृता यांना, “१९३० पासून १९७२ पर्यंत चे बजेट क्या प्रती मिळतील का?”, असा प्रश्न विचारला आहे.

Another Twitter user also wondered if they could get the budget copies until 1972.

कराचा बोजा सर्वसामान्यांवर न टाकता विकासाला प्रेरणा कशी द्यायची हे आता सर्व देश आपल्याकडून शिकतील, या अमृता यांच्या वक्तव्याचाही अनेकांनी ट्विटरवरुन समाचार घेतल्याचं पहायला मिळालं आहे. अनेकांनी इंधनावरील अधिभार वाढवण्यात आल्याची आठवण अमृता यांना करुन दिली आहे. त्यावर अमृता यांनी उत्तर देताना हा अधिभार थेट ग्राहकांना भरावा लागणार नसल्याचं म्हटलं. यावर आनंदा पाटील या व्यक्तीने, “बजेट तुमच्या गाण्यासारखच आहे. तसेच ज्यांना फोटोच स्पेलिंग येत नाही ते बजेटचे बारकावे समजवत आहेत,” असा टोला अमृता यांना लगावला.

 

नक्की वाचा >> अमृता फडणवीस म्हणतात, मी योग्य मुद्दा सापडल्यावरच बोलते आणि शिवसेनावाले…

अमृता यांनाही ट्रोलिंग झाल्यानंतर चार तासांनी एक लिंक शेअर करत आपल्या १०० वर्षात न पाहिलेल्या अर्थसंकल्पाच्या वक्तव्यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं. यामध्ये निर्मला सीतारामन यांनीच हा अर्थसंकल्प मागील शतकामध्ये पाहण्यात आला नसेल असा असेल असं म्हटल्याचं दिसत आहे.