Amruta Fadnavis Cleaning Video: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. त्यांची गाणी, फॅशन, व स्पष्टवक्तेपणा अनेकदा चर्चेत असतो. अमृता फडणवीस यांचा एक नवा व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात दौरा केला होता. नाशिक मधील काळाराम मंदिरात मोदी स्वच्छता करतानाचा एक फोटो या दौऱ्यातील लक्षवेधी क्षणांपैकी एक ठरला. पंतप्रधान मोदींनी स्वच्छता करतानाच भारतवासीयांना मंदिरांच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घेण्याचे सुद्धा आवाहन केले होते. यानुसार आता अमृता फडणवीस यांनी सुद्धा हातात लादी पुसण्याचा मॉब घेऊन मुंबईतील झावबा राम मंदिरामध्ये स्वच्छता मोहीम राबवली आहे. त्याचाच एक व्हिडीओ अमृता फडणवीस यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता. या व्हिडिओच्या खाली कमेंट करताना काहींनी कौतुक केलं आहे तर अनेकांनी ‘स्वच्छ जागेची स्वच्छता करण्यात काय मोठेपणा’ असे म्हणत उलटप्रश्न केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा