Shocking video: दही भारतातील सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांपैकी एक पदार्थ आहे. जेवणात फक्त दही किंवा ताकाचा वापर कल्याने अन्नाची चवच वाढत नाही तर त्याउलट हे आपल्या शरीराला दिवसभरातील अनेक पोषक तत्वांची पूर्ती करते. भारतीय स्वयंपाकघरात दही मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. लोक जेवल्यानंतर त्याचे सेवन करतात, याशिवाय चव वाढवण्यासाठी लोक पदार्थ बनवताना दहीही घालतात. यामुळे प्रत्येक महिला रोजच्या जेवणामध्ये दहीचा समावेश करत असते. पण दररोज दही खरेदी करणे चांगले नाही, म्हणून ते घरी बनवणे अधिक आरोग्यदायी असेल. मात्र तुम्ही हे दही विकतच आणत असाल तर आत्ताच थांबा. कारण सध्या समोर आलेला अमूल दहीचा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका तरुणानं बाजारतून अमूल कंपनीचं दही विकत आणलं होतं. मात्र ते दही भांड्यात काढताच ते दही त्याला थोडं वेगळं वाटू लागलं. व्हिडीओमध्ये तो दावा करत आहे की हे दही भेसळयूक्त आहे. हा तरुण दह्याला हात लावूनही बघत आहे, यावेळी त्याला दही चिकट लागत आहे. ज्याप्रमाणे मेओनीज असतं त्याप्रमाणे हे दही चिकट चिकट लागत आहे. व्हिडीओमध्ये तुम्हीही पाहू शकता, हे दही सामान्य दही असतं तसं दिसत नाहीये तर अतिशय चिकट दिसत आहे. हे पाहूनच यामध्ये काहीतरी प्रक्रिया केल्याचं दिसत आहे. पुढे हा तरुण हे दही खाऊन माझ्या मित्राचं पोट खराब झाल्याचंही सांगत आहे. तसेच हा तरुण अमूल कंपनीला विनंती करत आहे की, अशाप्रकारे भेसळ बंद करा..

दरम्यान तरुणानं हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करताच व्हिडीओ वेगानं व्हायरल झाला. त्यानंतर या व्हिडीओवर कंपनीनेही उत्तर दिलं आहे. कंपनीने रिप्लाय करत, “आम्हाला तुमच्या अनुभवाबद्दल जाणून घेण्याची काळजी वाटते. कृपया तुमचा संपर्क क्रमांक, निवासी पत्ता, तुम्ही दही खरेदी केलेल्या आऊटलेटचे नाव आणि बॅच नंबर आम्हाला DM करा जेणेकरून आम्ही याचा अधिक तपास करू शकू.” असं म्हंटलं आहे.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ its_vikas_kumawat_73 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. बाजारात आधीच मोठ्या प्रमाणावर आपली फसवणूक होत असते. भेसळयुक्त पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्याशिवाय आता आपल्याला पर्याय नाह. कारण- आता सर्वच पदार्थांमध्ये भेसळ केली जाते. त्यामुळेच हल्ली आजारी पडण्याचं प्रमाण वाढलं आहे. व्हिडीओवर नेटकरीही संतापजनक प्रतिक्रिया देत आहेत.

Story img Loader