डेअरी ब्रँड अमूलच्या पँकेज लस्सीला बुरशी लागल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओबाबत अमूलने स्पष्टीकरण जाहीर केले आहे. कंपनीने दावा केला आहे क, हा व्हिडिओ खोटा आहे आणि ग्राहकांमध्ये चूकीची माहिती आणि भिती परसविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल व्हिडिओबाबतअमूल काय म्हणाले?

व्हायरल व्हिडिओमध्ये अमूल लस्सीचे पॅकेट दाखवले आहे, त्यातील एक पॅकेटची वैधता या वर्षी १२ ऑक्टोबर रोजी संपणार आहे. जेव्हा हा माणूस लस्सीचा वरचा भाग उघडतो तेव्हा वरच्या बाजूला एक बुरशीसारखा पदार्थ दिसतो. अमूलने सांगितले “सोशल मीडियावर खोटो संदेश व्हायरल होत आहे, व्हिडिओ निर्मात्याने स्पष्टीकरणासाठी आमच्याशी संपर्क साधला नाही किंवा त्याचे ठिकाण देखील उघड केले नाही.”

हेही वाचा – कॅशिअरची नोकरी सोडून जंगलात राहतोय ‘हा’ व्यक्ती! निसर्गाच्या सहवासात राहण्यासाठी बांधलं सुंदर घर; आता असं जगतोय त्याचं आयुष्य

अमूलचा ग्राहकांना सल्ला

अमूलने असेही म्हटले आहे की, स्ट्रॉच्या जागी एक छिद्र आहे जिथून गळती देखील झाल्याचे दिसते. या छिद्रामुळे तेथे बुरशी आली असावी, बहुधा व्हिडिओ बनवणाऱ्याला त्याबद्दल आधीच माहिती असेल. अमूलने आपल्या ग्राहकांना फुगलेले आणि गळती पॅकेट खरेदी न करण्याचा सल्ला दिला आहे. लोकांमध्ये भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने हा व्हिडिओ बनवण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे.

नेटकऱ्यांनी दिले स्पष्टीकरण

दरम्यान अमुलच्या स्पष्टीकरणानंतरही अनेकांनी अमुलच्या लस्सीच्या गुणवत्तेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे तर काहींनी अमुलला पाठिंबा दिला.
ट्विटरवर@hiharsh07 वापरकर्त्याने लिहिले “खरं तर तुमच्या लस्सीची गुणवत्ता खराब झाली आहे. मी म्हणेन की ती लस्सी नाही, ती लस्सी चवीचं पाणी आहे.” दुसर्‍या युजरने लिहिले की, व्हिडिओच्या निर्मात्यावर शंका घेण्याऐवजी अमूलने स्वतःच्या गुणवत्तेवर लक्ष दिले पाहिजे.

हेही वाचा – एक चूक अन् ४० मगरींचा एका व्यक्तीवर भयानक हल्ला! ७२ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

ट्विटरवर @RiderBaba_ या वापरकर्त्याने लिहिले, “जर कोणी दुकानदार असे विकत असेल तर तो देखील लस्सी खराब केली जाऊ शकते किंवा त्याची ने-आण करताना काळजी घेतली नसावी त्यामुळे त्यासाठी अमुल जबाबदार कसे असू शकते.” आणखी एका यूजरने लिहिले की व्हिडिओमध्ये लक्ष देऊन पाहिल्यास दिसते की, हा व्हिडिओ फक्त वाद निर्माण करण्यासाठी तयार केला आहे. ”

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये अमुलच्या चार पॅकेट उघल्यानंतर बुरशी लागलेली दिसत होती. हा व्हिडिओ तयार करणाऱ्या व्यक्तीने हा व्हिडिओ कोठून तयार केला याचा खुलासा केला नाही. कंपनीचे म्हणणे आहे की, जितके पॅकेट उघडले त्यात आधीपासून छिद्र आहेत आणि गळती होत असलेली लस्सी ग्राहकांनी खरेदी करू नये.