सोशल मीडियावर आपणाला अपघातांचे अनेक व्हायरल व्हिडिओ पाहायला मिळतात. यातील अनेक अपघात होण्याचं प्रमुख कारणं असतं ते म्हणजे वाहनाचा वेग. कारण गाडी पळवण्याच्या नादात अनेकांचा वाहनावरील ताबा सुटतो ज्यामुळे अपघात होतात. शिवाय असे अपघात पाहून अनेकजण वाहन शिस्तीत आणि कमी वेगात चालवण्याचा धडा घेतात. पण काही लोक व्हिडीओ पाहूनही निष्काळजीपणाने वाहन चालवतात. ज्यामुळे त्यांना मोठ्या अपघाताला सामोरं जावं लागतं. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये भरधाव वेगात स्कूटी चालवणं एका व्यक्तीला खूप महागात पडल्याचं दिसत आहे.
व्हायरल व्हिडीओ पाहून अनेकांच्या अंगावर शहारा आला आहे. हा व्हिडीओ रस्त्यावरून जात असलेल्या एका दुचाकीस्वाराने शूट केला आहे. व्हिडीओत एक व्यक्ती रस्त्यावर अत्यंत धोकादायक पद्धतीने स्कूटी चालवताना दिसत आहे. ज्याची शिक्षा त्याला काही क्षणात मिळाल्याचं पाहायला मिळालं आहे. अपघातामुळे स्कूटी चालवणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाल्याचंही दिसत आहे.
निष्काळजीपणामुळे अपघात –
हेही पाहा- मामा असावा तर असा…! भाचीला लग्नात दिल्या ३ कोटींच्या भेटवस्तू, व्हायरल Video पाहून थक्क व्हाल
हेही पाहा- कारच्या छतावर, खिडकीतं उभं राहून बर्थडे पार्टी! YouTuber दीक्षितचा Video पोलिसांकडे पोहोचला, अन्…
व्हायरल होत असलेला व्हिडिओ RPG एंटरप्रायझेसचे अध्यक्ष आणि उद्योगपती हर्ष गोयंका यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती अत्यंत धोकादायक पद्धतीने रस्त्यावर स्कूटी चालवताना दिसत आहे. यादरम्यान तो विचित्र स्टंट करतो आणि त्याचा स्कूटीवरील ताबा सुटतो. ज्यामुळे तो रस्त्यावर खूप जोरात पडतो आणि त्याला गंभीर दुखापत होते.
स्कूटीवरून पडताच त्या व्यक्तीच्या चेहऱ्याला दुखापत झाल्याचं व्हिडीओत दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना हर्ष गोयंका यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, आता तुम्हाला योग्य टायर का आवश्यक आहेत हे समजेल, सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तर अनेक नेटकरी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी रस्त्यावर निष्काळजीपणे वाहन चालविण्याचे फळ मिळालं असल्याचं कमेंट बॉक्समध्ये म्हटलं आहे.