Viral video: दरवर्षी होळीनंतर इंदोरमध्ये प्रतिष्ठित रंगपंचमीचे आयोजन केले जाते. यात सुमारे ५ लाख लोक सहभागी होतात आणि ही एखाद्या भव्य धार्मिक रॅलीप्रमाणे आयोजित केली जाते. दरम्यान यावेळी तिथे उपस्थीत ५ लाख लोकांची जबाबदारी सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांची झोप उडवणारी धक्कादायक घटना समोर आली. नक्की काय घडलं जाणून घेऊयात. झालं असं की, इंदोरमध्ये निघालेल्या एका धार्मिक यात्रेत ५ लाख लोक सहभागी झाले होते. या दरम्यान एक आश्चर्यकारक प्रकार पाहायला मिळाला. पाच लाख लोकांच्या गर्दीच रुग्णवाहिका अडकली अन् पुढे काय घडलं हे तुम्हीच पाहा. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाच लाखांच्या गर्दीत रुग्णवाहिका पोहोचली तेव्हा ड्युटीवर असलेल्या अधिकाऱ्यांना धक्काच बसला. लाखोंच्या गर्दीतून वाट काढणे अवघड होते,मात्र लोकांच्या शिस्तबद्ध कार्यक्रमामुळे रुग्णवाहिकेला ताबडतोब वाट करून दिली. अन् काही मिनिटात रुग्णवाहिका गर्दी मधून बाहेर पडली. जिथे नजर जाईल तिकडे नागरिक उभे होते. तेथे उपस्थित असलेल्या ५ लाखांच्या जमावाने शहाणपणा दाखवत रुग्णवाहिकेचा मार्ग मोकळा केला. या रॅलीदरम्यान रस्ता खचाखच भरलेला असतो.गर्दीत हजारो महिला पोलीस आणि पुरूष पोलीस बंदोबस्तसाठी तैनात केले जातात.
या गर्दीच्या प्रवासात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव स्वतः उपस्थित होते. या रंगपंचमी मिरवणुकीत रुग्णवाहिकेला रस्ता देण्याचा प्रसंग आल्यावर सर्वजण आपली मजा सोडून रुग्णवाहिकेला रस्ता देण्यात व्यस्त झाले. आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो अंकित कुमार अवस्थी नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIDEO: दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ! बिबट्या तरस आणि मगरीमध्ये जोरदार युद्ध, शेवटी कोण जिंकलं?
या व्हिडीओला आतापर्यंत १ लाख १२ हजारांहून अधिक व्ह्यूज आले आहेत. तसेच लाइकही करण्यात आले आहे. यावर लोकांनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.