Ancient Vishnu Idol : २२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत श्री रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. श्री रामाच्या या खास मूर्तीची सगळीकडे चर्चा सुरू असताना आता कृष्णा नदीत भगवान विष्णूची एक मूर्ती सापडली आहे. विशेष म्हणजे ही मूर्ती प्रभू श्री रामाच्या मूर्तीसारखीच दिसते. सध्या या भगवान विष्णूच्या मूर्तीचे फोटो सगळीकडे व्हायरल होत आहे.

कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यातील एका गावात कृष्णा नदी पात्रात ही भगवान विष्णूची मूर्ती सापडली आहे. या मूर्तीमध्ये भगवान विष्णूचा दशावतार दिसत असून त्याचबरोबर एक शिवलिंग सुद्धा सापडले आहे. रायचूर जिल्ह्यातील देवसुगूर गावाजवळच्या कृष्णा नदीवर पूल बांधण्यात येत असून बांधकामाच्या वेळी ही जुनी मू्र्ती सापडली. सदर मूर्ती ही ११ व्या शतकातील असून रामलल्लांच्या मूर्तीसारखे याचे प्रारूप असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Vaibhav Chavan
“अंकिता आणि आमचे दाजी…”, वैभव चव्हाणने ‘कोकण हार्टेड गर्ल’बरोबरचे शेअर केले फोटो; नेटकरी म्हणाले, “विश्वास बसत नाही…”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
7 year old boy drew a picture of Dhananjay Powar on his hand
७ वर्षांच्या मुलाने धनंजय पोवारचं हातावर काढलं चित्र, आई डीपीला फोटो पाठवून म्हणाली, “दादा काय जादू केली…”
comet Temple Tuttle, meteor shower, sky
आकाशात उल्‍कावर्षावाचे मनोहारी दृश्‍य; सज्‍ज व्‍हा…
Numerology: People Born on These Dates Are Blessed by Lord Shani
‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांवर असते नेहमी शनि देवाची कृपा
sussane khan share photo of son hridaan and hrehaan
हृतिक रोशन-सुझान खानची मुलं झाली मोठी, फोटो पाहून चाहते म्हणाले, “ते बॉलीवूडचे…”
Sadhvi Pragya Sing Thakur
Sadhvi Pragya : साध्वी प्रज्ञा यांनी पोस्ट केला सुजलेल्या चेहऱ्याचा फोटो; म्हणाल्या, “मी जगले वाचले तर काँग्रेसच्या टॉर्चरविरोधात…”
Guddi Maruti reveals shocking details about Divya Bharti death
“तोंड रक्ताने माखलेली एक…”, दिव्या भारतीच्या निधनाबद्दल बॉलीवूड अभिनेत्रीचा मोठा खुलासा; तिला पडताना ‘या’ व्यक्तीने पाहिल्याचा केला दावा

“या मूर्ती वर अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण कोरीव काम केले आहे. या खास मूर्तीमध्ये मत्स्य, कुर्मा, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध, आणि कल्की या विष्णूचे दहा अवतार रेखाटले आहे.” इतिहासकार डॉ. पद्मजा देसाई सांगतात.

हेही वाचा : Rose Farming : गुलाबाची अशी करा लागवड अन् महिन्याला ५० ते ६० हजार रुपये कमवा; जाणून घ्या गुलाबाच्या शेतीसाठी खर्च किती येईल?

Girish Bharadwaj या एक्स अकाउंटवरुन या विष्णूच्या मूर्तीचा फोटो शेअर करण्यात आला असून या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आपल्या प्राचीन गोष्टी पुन्हा समोर येत आहे. कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यातील देवसुगूर गावात कृष्णा नदीत विष्णूची मूर्ती सापडली.”
या फोटोमध्ये तुम्हाला ही विष्णूची सुंदर मूर्ती दिसेल. या मूर्तीवर अतिशय रेखीव काम केले आहे. अयोध्येतील प्रभू रामाच्या मूर्तीची रचना आणि या मूर्तीची रचना एकसारखीच दिसतेय. जानेवारी महिन्यात राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. आता त्या सारखीच दिसणारी विष्णूची मूर्ती सापडल्याने सर्वत्र एकच चर्चा रंगली आहे.

या फोटोवर अनेक यूजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “ही मूर्ती रामलल्लासारखी दिसतेय” तर एका युजरने लिहिलेय, “आश्चर्यकारक!प्रभू रामाच्या मूर्तीसारखीच ही मूर्ती दिसतेय.”