गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांना आपले हसू आवरणे कठीण जात आहे. परंतु ज्यांच्यासोबत ही घटना घडली आहे, ते मात्र यामुळे नक्कीच घाबरले असतील. प्राण्यांच्या हल्ल्याची भीती सर्वांनाच असते, पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही पक्ष्यांची भीती वाटू लागेल. या व्हिडिओमध्ये एक कावळा लोकांवर आपला राग काढताना दिसत आहे. काही सेकंदांचा हा ट्रेंडिंग व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की काही लोक एका सोसायटीच्या गार्डन एरियामध्ये चालत आहेत. मात्र या लोकांना पुढच्या क्षणी आपल्यासोबत काय होणार आहे याची जराही कल्पना नाही आहे. काही क्षणातच अचानक एक कावळा येतो आणि मागून त्यांच्या डोक्यावर हल्ला करून निघून जातो. एका कावळ्याने त्यांच्यावर हल्ला केल्याचे समजताच लोक घाबरतात आणि त्याच्यापासून वाचण्याचा प्रयत्न करू लागतात.

हा तरुण लोकांना मिठी मारून तासाला कमावतो ७ हजार रुपये! जाणून घ्या काय आहे प्रकरण

ज्यांच्यावर हा हल्ला झाला आहे, त्यांना नक्कीच धक्का बसला असेल. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना आपले हसू आवरता येत नाही आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, हा कावळा मिशनवर आहे.

दिल्लीच्या मेट्रोमधील जोडप्याच्या मारामारीसाठी कारण ठरलं ‘Zara’चं टीशर्ट; भांडणाचा Video Viral

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून याला आतापर्यंत २ दशलक्षाहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर एक लाखाहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाइक केले आहे. कमेंट सेक्शनमध्येही हजारो लोकांनी त्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: An angry crow attacked walking people watch viral video pvp