Viral Video : असं म्हणतात, मनात जिद्द असेल तर सर्वकाही शक्य होतं. एखादी गोष्ट तुम्ही मनापासून ठरवली आणि त्यासाठी मेहनत घेतली तर नक्की यश मिळते फक्त हिंमत असावी लागते. हल्ली काही तरुणांना आठ- आठ तासाची शिफ्ट करुन नोकरी करणे आवडत नाही.त्यांना स्वत:चा स्टार्टअप सुरू करावासा वाटतो. अनेक तरुण मंडळी नोकरी सोडून स्टार्टअप सुरू करतात.
बंगळूरू हे देशातील असे शहर आहे जे फक्त आयटी हबसाठी ओळखले जाते. येथे दूरवरुन मुले नोकरीसाठी येतात. अनेक स्वप्ने मनात ठेवून आठ आठ तासाचा जॉब करतात. याच शहरात राहणाऱ्या एका तरुणाला हे मान्य नव्हतं. हो आज आपण बंगळूरूच्या अशाच एका तरुणाविषयी जाणून घेणार आहोत.
सध्या सोशल मीडियावर या तरुणाची जोरदार चर्चा सुरू आहे. कारण त्याने त्याचा आर्किटेक्टचा जॉब सोडून वडापावचा गाडा सुरू केला आहे. तरुणाच्या या हिंमतीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. कॉर्पोरेट जग नको वाटणाऱ्या या तरुणाला वडापाव विकताना समाधान वाटत आहे.
हेही वाचा : बापरे! रुळावर फोटोशूट करत होता; मागून रेल्वे आली अन् होत्याचे नव्हते झाले, धक्कादायक व्हिडीओ व्हायरल
या तरुणा संदर्भात बंगळूरूच्या एका विश्वास रावत नावाच्या व्यक्तीनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी या वडापाव विकणाऱ्या तरुणाची फोटो शेअर करत लिहिलेय, “या मुलाला भेटा जो मला झुडीओ एचएसआरजवळ भेटलाय. याने वडापावचा गाडा उभा करण्यासाठी कॉर्पोरेट जग सोडले. बंगळूरूमध्ये राहणे इनोव्हेशन रोलरकोस्टरवर एक रोमांचक राइड आहे”
या पोस्टमध्ये विश्वास रावत यांनी या तरुणाचा फोटो शेअर केला आहे. या तरुणाने हातात एक बोर्ड धरला आहे. त्यावर लिहिलेय, “मी सुपरहिरो नाही पण मी वडापावच्या मदतीने दिवस वाचवू शकतो.” तरुणाचे हे हृदयस्पर्शी वाक्य ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.
असं म्हणतात, आपल्याला आवडतात त्या गोष्टी करायला पाहिजे.या तरुणाने कशाचीही पर्वा न करता हेच केले. या तरुणाने दाखवून दिले की तणावात नोकरी करण्यापेक्षा ज्या गोष्टीमध्ये आपल्याला आनंद मिळतो, ते काम करणे कधीही चांगले आहे.