आपल्या परिस्थितीवर नाराज होण्यापेक्षा, ज्या लोकांना दोन वेळच्या अन्नासाठीही स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करावे लागते, एकदा त्यांना भेटा, मग तुम्ही किती सुखी आहात याचा अंदाज येईल, असं आपणाला अनेकदा वरिष्ठांकडून सांगितलं जातं. कारण जगात असे अनेक लोक आहेत ज्यांना दोन वेळच्या अन्नासाठी दररोज जीवघेणा संघर्ष करावा लागतो. सध्या असाच काही बांधकाम कामगारांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून अनेकांना या तरुणांच्या धाडसाचे कौतुक करायचे की, त्याच्या परिस्थितीची कीव करायची हेच समजत नसल्याचं म्हटलं आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, हे कामगार कोणत्याही सुरक्षा साधनांशिवाय काम करताना पाहून अनेकांना वाईट वाटतं आहे. शिवाय आपण कामगारांच्या परिस्थितीबद्दल फारशी चर्चा करत नाही. त्यांच्या सुरक्षेकडे देखील कधी गांभीर्याने पाहिले जाते नाही आणि त्यामुळेच अनेक बांधकाम कामगारांना दुर्दैवी अपघातांमध्ये आपला जीव गमवावा लागतो. सध्या असाच व्हिडीओ व्हायरल होत आहे जो पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला आहे.
हेही वाचा- बायकोचा राग घालवण्यासाठी लॉटरी घ्यायला गेला आणि क्षणात १० कोटींचा मालक बनला; कसं ते जाणून घ्या
सध्या या कामगारांच्या परिस्थितीची चर्चा सुरु झाली आहे ती म्हणजे एका ऑस्ट्रेलियन पत्रकारामुळे. हो कारण या पत्रकाराने त्याच्या @plalor नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन काही कामगारांचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये हे कामगार एका उंच इमारतीवर काम करताना दिसत आहेत. व्हिडिओ पोस्ट करताना या पत्रकाराने त्याच्या कॅप्शनमध्ये, भारतीय बांधकाम कामगार खूप धाडसी आहेत, परंतु मला वाटते की त्यांना बांधकाम साइटवर स्वतःचे संरक्षण करण्यासाठी त्यांना एका यूनियन आवश्यकता आहे. कारण ते आपल्या सुरक्षेसाठीच्या साधनांची मागणी करु शकतील. सध्या ते ९ व्या मजल्याचे काम करतायत आणखी ९ मजले बाकी आहेत, असंही त्याने लिहिलं आहे.