नैराश्येच्या गर्तेत अडकलेले अनेक जण आत्महत्या करून आपलं आयुष्य संपवतात. अभ्यास, अपयश, काही वैयक्तिक आयुष्यातल्या समस्यांवर तोडगा निघेनासा झाला की आत्महत्या करण्याचा मार्ग त्यांच्यासमोर उरतो. यात विद्यार्थ्यांचा समावेश जास्त आहे. घरातल्या किंवा हॉस्टेलच्या पंख्याला गळफास लावून आत्महत्या करण्याचे प्रमाण एवढं आहे की देशातल्या एका शहराचा विचार करायचा झाला तरी इथे दर महिन्याला किमान एक विद्यार्थी तरी पंख्याला लटकून आत्महत्या करतो. यातल्या काही मुलांवर समुपदेशन करून त्यांना नैराश्येच्या गर्तेतून बाहेर काढता येतंही, पण काही मुलं मात्र चार भिंतीत पंख्याला लटकवून आपले जगण्याचे सारे मार्ग कायमचे बंद करून टाकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Viral : हा व्हिडिओ पाहण्यासाठी मन घट्ट करा!

Viral Video : भक्ष्य समजून सापाने गिळली प्लॅस्टिकची बाटली

तेव्हा कोटामधल्या एका इंजिनिअरने असा पंखा बनवला आहे. जो आत्महत्या करणाऱ्याचा जीव घेणार नाही तर जीव वाचवणार आहे. व्यवसायाने इलेक्ट्रिकल इंजिनिअर असलेले शरद अशनी यांनी पंख्यासाठी असं तंत्र विकसित केलंय की ज्याच्यामुळे आत्महत्या करणाऱ्यांचे प्राण वाचणार आहेत. त्यांनी तयार केलेल्या पंख्यांमध्ये एक स्प्रिंग बसवली आहे. जेव्हा एखाद्या मुलाने पंख्याला गळफास लावून घेण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्या वजनाने पंखा आपोआप खाली येईल आणि त्याचे प्राणही वाचतील. हे पंखे बसवण्यासाठी फार खर्चही येणार नाही, सध्या शरद यांनी बनवलेले पंखे कोटामधल्या वसतीगृहात बसवण्यात आले आहेत. या पंख्यामुळे अनेकांचे प्राण वाचतील असा विश्वास त्यांना आहे.