Viral Video : सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी रस्त्यावर चित्ता दिसतो तर कधी वाघ. सोशल मीडियावर तुम्ही अनेक व्हिडीओ पाहिले असेल ज्यामध्ये अनेकदा प्राणी घाबरून सैरावैरा पळताना तर कधी ओरडताना पाहिले असेल. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडाओमध्ये एक हत्ती भर रस्त्यावर पळताना दिसत आहे. हा हत्ती सर्कसमधून पळाला अशी माहिती समोर आली आहे.

हा व्हायरल व्हिडीओ भारतातील कोणत्याही शहरातील नसून अमेरिकेतील मोंटाना शहरातील आहे. मंगळवारी दुपारी मोंटाना शहरात अचानक रस्त्यावर हत्ती सैरावैरा पळताना दिसला आणि हे पाहून नागरीकांची एकच तारांबळ उडाली. अनेक जण असे रस्त्यावर हत्तीला पाहून अवाक् झाले. काही लोकांनी ही घटना त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

Tiger enters toilet window viral video on social media
बापरे! शौचालयाच्या खिडकीत शिरला वाघ, मान बाहेर काढली अन्…, VIDEO मध्ये पाहा पुढे काय झालं…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
Vasota Jungle Trek
मरणाची गर्दी! वासोटा ट्रेकला जाण्यापूर्वी हा VIDEO एकदा पाहाच
amazing Ukhana for wife
“आला आला वाघ…?” कोल्हापुरच्या रांगड्या नवरदेवाचा बायकोसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO एकदा पाहाच
AI camera alerts authorities to halt train near Odisha elephant herd averting major accident video viral
अचानक रुळावर आला हत्तींचा कळप अन्….; पुढे जे घडले ते पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही, Video Viral
Shocking video Komodo Dragon Eat Goat In Just 5 Seconds Animal Video Viral
“या” महाकाय प्राण्यानं ५ सेकंदात गिळली जिवंत बकरी; पोटातून येतोय रडतानाचा आवाज, VIDEO पाहून काळजाचं पाणी होईल
do you know which fort is this
हा कोणता किल्ला आहे, तुम्ही ओळखू शकता का? Viral Video एकदा पाहाच

हेही वाचा : “आईवडिलांपासून दूर राहण्याचे काही फायदे आहेत की फक्त स्वातंत्र्य..” तरुणाच्या पोस्टची एकच चर्चा, व्हायरल पोस्टवर तुमचे काय मत?

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : “आयुष्याचे दुसरे नाव संघर्ष…”, UPSC परीक्षेत यश न मिळालेल्या उमेदवाराची पोस्ट तुफान व्हायरल, यशापेक्षा अपयशाची चर्चा जास्त

व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की हत्ती रस्ता ओलांडताना दिसत आहे. विशेष म्हणजे या हत्तीने कोणत्याही प्रकारची नासधूस केलेली नाही. हत्ती वाहनाच्या मधोमध नीट जाताना दिसतोय. व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की या हत्तीमागे एक व्यक्ती हातात काठी घेऊन धावत आहे. कदाचित ती सर्कसमधील व्यक्ती असावी जी हत्तीला थांबविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या या व्हिडीओची चांगलीच चर्चा सुरू आहे. अनेक जण हा व्हिडीओ शेअर करत आहे. यापूर्वी सुद्धा रस्त्यावर पळत सुटलेल्या हत्तीचे असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहे.

Crime With Bobby या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मोंटानामध्ये मोकाट सुटलेला हत्ती” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Story img Loader