Viral Video: आई आणि मुलाचे नाते अतूट असते. मग ते माणसांचे असो किंवा प्राण्यांचे. एखादी आई आपल्या मुलांसाठी काहीही करू शकते. आपल्या मुलांसाठी ती कोणाशीही भिडू शकते. असाच एका आईच्या धाडसाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर तूफान व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एक हत्तीण आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी मगरीशी भिडते आणि आपल्या पिल्लाला मगरीच्या तावडीतून सुखरूप सोडवते. या आईने स्वतःचा जीव धोक्यात घालून, आपल्या पिल्लाला सुखरूप वाचवल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होतोय. या आईचे आपल्या मुलाला मगरीच्या तावडीतून सोडवण्याची धडपड पाहून तुम्हीही भावूक व्हाल.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की मगरीने हत्तीणीच्या पिल्लाची सोंड दातांमध्ये पकडली आहे. मगरीने पकडल्यानंतर हत्तीणीचे पिल्लू जोरात ओरडायला लागते. त्याच्या आवाजात तुम्हाला वेदना आणि भीती दोन्ही जाणवू शकतात. क्षणभर असं वाटतं की ते पिल्लू जगू शकणार नाही, पण त्याचवेळी त्याची आई पुढे येते आणि एका झटक्याने पिल्लाला वेगळे करून मगरीवर वार करते. हत्तीणीने दिलेल्या झटक्याने मगर लगेच पिल्लाची सुटका करते.

( हे ही वाचा: जागरणमध्ये ढोल वाजवणार्‍या एका व्यक्तीने जिंकले लाखो लोकांचे मन, जस्टिन बीबरही झाला फॅन, पहा Viral Video)

( हे ही वाच: पहा Viral Video : वडिलांना स्टेजवर पाहून मुलगी ओरडली आणि म्हणाली Love you Daddy!!, हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल)

हा व्हिडीओ आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी ट्विटरवर शेअर केला असून आतापर्यंत या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. तसंच लोक व्हिडिओमध्ये आईच्या धाडसाचे कौतुक करताना दिसत आहेत. अंजनी कुमार यांनी लिहिले, आता हे सिद्ध झाले आहे की आईची जागा कोणतेच नाते घेऊ शकत नाही. जयराम सिंह यांनी लिहिले, संपूर्ण विश्वात जन्म देणारी आई आहे जी आपल्या मुलांसाठी सर्वस्व अर्पण करते.

Story img Loader