तामिळनाडूच्या सीआयडी पोलिसांनी गुरुवारी तंजावरमधील एका व्यक्तीच्या बँक लॉकरमधून ५०० कोटी रुपयांचे पाचूचे बनवलेले शिवलिंग जप्त केले. WION अहवालानुसार, या कारवाईनंतर एडीजीपी जयंता मुरली यांनी शुक्रवारी चेन्नई येथे पत्रकारांना सांगितले की, त्यांना तंजावरमधील एका घरात पाचूपासून बनवलेले शिवलिंग ठेवले असल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर आम्ही तेथे छापा टाकला आणि त्या व्यक्तीच्या बँक लॉकरमधून ते जप्त केले.
५०० कोटी आहे किंमत
शिवलिंगाचे वजन ५३० ग्रॅम आणि उंची ८ सेमी आहे. एडीजीपी म्हणाले की, रत्नशास्त्रज्ञांनी या पुतळ्याची किंमत ५०० कोटी रुपये आहे. शास्त्रोक्त विश्लेषण करून ते कोणत्या मंदिराचे आहे हे ओळखावे लागेल. वडील समियप्पन यांना पुरातन वास्तू कशी आणि कोठून मिळाली याबाबत अरुण स्वत: अनभिज्ञ असल्याचा दावा केला. नागपट्टिनमजवळील थिरुक्कुवलाई येथील जुन्या थ्यागराज स्वामी मंदिरातून २०१६ मध्ये ही चोरी झाली होती.
(हे ही वाचा: थंडी वाजते म्हणून कुत्र्याने केला हटके जुगाड, हा Viral Video एकदा बघाच!)
एक हजार वर्ष जुनं शिवलिंग
माहितीनुसार, ते केव्हा बनवले गेले असावे, हे वैज्ञानिक तपासातून कळू शकले नाही, परंतु ते हजार वर्षे जुने शिवलिंग असल्याचे मानले जाते.
(हे ही वाचा: शेळीने दिला मानवासारख्या मुलाला जन्म! सोशल मीडियावर फोटो Viral)
‘अशा’ प्रकारे हे शिवलिंग भारतात आले
असे मानले जाते की हे पाचूपासून बनवलेले शिवलिंग पूर्व आशियाच्या दक्षिण भारतातील महाराज राजेंद्र चोल यांनी विकत घेतले आणि मंदिराला दिले.