सोशल मीडियावर दररोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. मात्र, या लाखो व्हिडीओमध्ये एखादाच व्हिडिओ असतो जो नेटकऱ्यांना भावतात, त्यांच्या काळजाला भिडतो. सध्या असाचं एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मायलेकीच्या भावनिक आणि प्रेमळ नात्यातील ओलावा पाहून नेटकऱ्यांचे डोळे पाणावले आहेत.
खरंतर हा व्हिडीओ २०२२ मध्ये सोशल मीडियावर शेअर केलेला आहे. मात्र, तो पुन्हा एकदा व्हायरल होतं आहे. शिवाय हा व्हिडीओतील दृश्य काय आहे हे शब्दात मांडता न येणारं आहे. व्हायरल या व्हिडीओमध्ये एका मुलीची आई रस्त्यावर फळे विकण्यासाठी बसल्याचं दिसत आहे.
उन्हामुळे आपल्या आईला गरम होत असल्याचं या लहान मुलीला जाणवताच, ती आईचं कडक उन्हापासून संरक्षण करण्यासाठी आपल्या चिमुकल्या हातांनी वारा घालण्याचा प्रयत्न करत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी खूप भावूक झाले असून हा व्हिडीओ अनेक लोकांना आवडला आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ इंस्टाग्रामवर bhutni_ke_memes नावाच्या वापरकर्त्याने जून २०२२ मध्ये शेअर केला असून तो नव्याने चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एका चिमुरडीची तिच्या कष्टकरी आईबद्दल असणारे प्रेम दिसतं असल्याचं नेटकरी म्हणत आहेत.
शिवाय एक मुलगीच आपल्या आई-वडिलांना चांगल्याप्रकारे सांभाळू शकते आणि त्यांचा त्रास समजू शकते अशादेखील काही कमेंट नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. त्यामुळे या व्हिडीओच्या निमित्ताने पु्न्हा एकदा आई-मुलीच्या प्रेमळ नात्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाल्याचं पाहायवा मिळतं आहे.