केरळच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधील एका विद्यार्थीने वार्डनला लिहिलेले पत्र खूप व्हायरल होत आहे. या पत्रात तिने माफी मागितली आहे. पण तुम्हाला वाटेल मुलीने असे काय केले की ती माफी मागत आहे आणि सध्या तिने लिहिलेलं पत्र एवढे व्हायरल का होत आहे जे जाणून घेऊया.
मिळालेल्या माहितीनुसार, केरळच्या एका इंजिनिअरिंग कॉलेजमधील एका विद्यार्थीनीचा फोन वार्डनने जप्त केला. फोन जप्त करण्याचं कारण म्हणजे, ही मुरगी अंघोळ करताना गाणे म्हणत होती म्हणून तिला ही शिक्षा देण्यात आली. त्यानंतर तिने माफीदेखील मागितली. मात्र, तिच्या माफीने काहीही फरक पडला नाही. या घटनेविषयी एका यूजरने रेडिटवर पोस्ट शेअर करत सांगितले. ही विद्यार्थी अमल ज्योति कॉलेज ऑफ इंजिनिअरिगची असल्याचं सांगितलं जात आहे. या विद्यार्थीनीला फोन परत मागण्यासाठी माफीचा अर्ज द्यावा लागला. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हेही वाचा : गौतमी पाटीलचा नवा डान्स व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणतात, “टीका करण्यासारखं नाचणं….”
रेडिट यूजर @bheemanreghu ने अर्जासोबत त्या मुलीची फोटो शेअर केली आहे. या अर्जात या मुलीने लिहिले आहे, “अंघोळ करताना गाणे ऐकण्यासाठी मी प्रामाणिकपणे माफी मागते. असे पु्न्हा होणार नाही. मी तुम्हाला विनंती करते की माझा फोन परत द्या कारण मला खूप महत्त्वाचे काम आहे आणि प्रोजेक्ट पूर्ण करायचा आहे.”
हेही वाचा : अरेच्चा ! गोविंदा आणि करीश्मा कपूरलाही टाकले मागे, नवरदेव नवरीचा भन्नाट डान्स पाहून तुम्हीही व्हाल फॅन
रेडिटवरील या पोस्टवर अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. एक यूजर लिहितो, ‘ही खूप मोठी हुकूमशाही आहे’ तर दुसरा यूजर लिहितो, ” ही हुकूमशाहीची वागणूक आहे, कुणी अंघोळ करताना आपल्या मनाने गाणंही म्हणू शकत नाही का?”