एलिना कुमारी या चिमुकलीला जगात येऊन फक्त तीन दिवस झाले आहे. तरीही तिच्या जन्माची जगभरात चर्चा आहे. आणि याचे कारण आहे ते एलिनाची जन्मतारिख. तिचा जन्म बरोबर १२ वाजून १ मिनिटांनी झाला. म्हणूनच २०१७ मध्ये जन्मलेली ती ब्रिटनची पहिली मुलगी ठरली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

VIRAL VIDEO : सापाने चक्क अजगराला गिळले

एलिना कुमारी ही भारतीय वंशाची आहे. तिच्या जन्मवेळेमुळे तिच्या नावाची चर्चा अधिक आहे. कारण २०१७ मध्ये जन्मलेली ती पहिली व्यक्ती आहे. तिची जन्मतारिख १ जानेवारी असली तरी तिची जन्मवेळ रात्री १२ वाजून १ मिनिटे अशी आहे. या वेळेमुळेच तिच्या जन्माची चर्चा आहे. बर्मिंगहॅम येथील रुग्णालयात तिचा जन्म झाला. भारती कुमारी असे एलिनाच्या आईचे नाव आहे. एलिनाला दोन वर्षांचा छोटा भाऊ देखील आहे. एलिनाची प्रकृतीही उत्तम आहे. भारती यांची प्रसूतीची तारिख ही डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होती. त्यातून ३१ डिसेंबरला त्यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आणि बरोबर १२ वाजून १ मिनिटांनी एलिनाचा जन्म झाला. पण त्याचबरोबर या वर्षांत जन्मलेली एलिना ही ब्रिटनमधली पहिली व्यक्ती ठरली. तिच्या जन्मवेळेमुळे जगभर तिची चर्चा आहे.

Viral Video : मेघालयच्या मुख्यमंत्र्यांची विरोधकांसोबत सांगितिक जुगलबंदी