Viral Video: भाजी आणलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या गोळा करून ठेवणे, हॉटेलमधून पदार्थांचे पार्सल येणारे येणारे कंटेनर, तर मिठाईच्या बॉक्सपासून काही टाकाऊपासून टिकाऊ, तर उरलेल्या भाज्यांपासून काही तरी आगळावेगळा पदार्थ करणे आदी अनेक गोष्टीत आईचा हात कोणीच धरू शकत नाही. अशातच आईची आणखीन एक सवय म्हणजे इमारतीच्या खिडक्या किंवा बाल्कनीत आपल्याला कपडे वाळत किंवा सुकत घालणे.तर, आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये एक भारतीय महिला आलिशान रिसॉर्टच्या इमारतीच्या बाल्कनीत कपडे सुकत घालताना दिसते आहे.

व्हायरल झालेला हा व्हिडीओ दुबईतील आहे. पल्लवी व्यंकटेश इन्स्टाग्राम युजर सुट्यामध्ये कौटुंबिक सहलीला गेली होती आणि ती तेथे अटलांटिस द पाम या रिसॉर्टमध्ये राहिली होती. तर त्या व्हिडीओत पल्लवीची आई रिसॉर्टच्या आलिशान इमारतीच्या बाल्कनीत कपडे वाळवताना दिसत आहे. हे पाहताच पल्लवी आईचा व्हिडीओ शूट करते आणि सोशल मीडियावर शेअर करते. नक्की काय शूट केलं आहे व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…

wrestler Suraj Nikam Suicide
‘कुमार महाराष्ट्र केसरी’ सूरज निकमने गळफास घेत आयुष्य संपवलं, कुस्ती विश्वावर शोककळा
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
What happens to your body when you have sex every day
रोज सेक्स केल्याने शरीर, मन व नात्यात काय बदल होतात? थट्टा, मस्करी न करता डॉक्टरांनी दिलेली ही माहिती वाचा
mrunal dusanis says live in america is more difficult than India
“अमेरिकेत राहणं खूप अवघड”, चार वर्षांनी भारतात आलेल्या मृणाल दुसानिसने सांगितलं परदेशातील राहणीमान, म्हणाली…
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
Rape case Story
१२ व्या वर्षी गँगरेप, १३व्या वर्षी मातृत्त्व; २४ वर्षांनी त्याच मुलाने आईचे पांग फेडले, नराधमांना शोधून घेतला बदला!
Abhishek Nayar Statement on Sex in cricket
‘क्रिकेटमध्ये सेक्स ही अत्यंत सामान्य गोष्ट…’, अभिषेक नायरचे मुलाखतीत मोठे वक्तव्य, म्हणाला; “एवढं दडपण असतं की…”

हेही वाचा…VIDEO : पुस्तक खेचले, सीट ढकलली अन्… चिमुकल्याच्या कृत्याने गर्भवती महिला त्रस्त; मुलाकडे दुर्लक्ष करणाऱ्या आईला प्रवाशाने शिकवला धडा

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, इन्स्टाग्राम युजरची आई रिसॉर्टच्या आलिशान इमारतीच्या बाल्कनीत कपडे सुकवतेय. ते पाहून दुबईच्या ‘अटलांटिस द पाम’च्या मालकाने अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून प्रतिक्रिया दिली आहे. “आईची कर्तव्ये. आम्ही आशा करतो की, आमच्या रूममध्ये तुम्ही सहलीदरम्यान आनंद घेत असाल. आम्ही प्रत्येक बाथरूममध्ये ड्राईंग कॉर्डची व्यवस्था करतो; जेणेकरून तुम्ही अंघोळ झाल्यावर तुमचे कपडे सुकवू शकता”, अशी कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिली आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @iam.pallavivenkatesh या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या ११ दशलक्षांहून अधिक व्ह्युज मिळाल्या आहेत. व्हिडीओ व्हायरल होताच नेटकरी संमिश्र प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एका युजरने कमेंट केली आहे की, प्रत्येक ठिकाणी गेल्यावर तेथील नियम पाळले गेले पाहिजेत. तर दुसरा युजर म्हणतोय की, यात वाईट असं काहीच नाही आहे. तसेच अनेक जण आई साधीभोळी असते, असे म्हणताना दिसत आहेत.