Viral Video : शाळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक सुंदर भाग आहे. शाळेचे शिक्षक, वर्गमित्र-मैत्रीणी आजही आठवले तरी चेहऱ्यावर हसू येते. शाळेच्या आठवणी कायम आपल्या मनात जिवंत असतात. सोशल मीडियावर असे अनेक शाळेचे व्हिडीओ किंवा शाळेतील मजेशीर किस्से व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकदा शाळेच्या आठवणीत आपण रमतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकली वर्गात प्रार्थना सुरू असताना डान्स करताना दिसते. त्या चिमुकल्या विद्यार्थीनीचा निरागसपणा पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (An innocent girl student danced in class while everyone closed their eyes for prayer video goes viral on social media)
वर्गात प्रार्थना सुरू असताना चिमुकली एकटी करत होती डान्स
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की वर्गात प्रार्थना सुरू आहे. सर्व विद्यार्थांनी डोळे मिटलेले आहे पण मागून दुसऱ्या बाकावर बसलेली ही विद्यार्थी डोळे मिटून डान्स करताना दिसते. ती एकटीच डान्सचा आनंद लुटताना दिसते. तिचा हा निरागसपणा पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या चिमुकलीला सुद्धा ठाऊक नसते की तिचा कोणीतरी व्हिडीओ शूट करत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक लोकांना त्यांचे बालपण आठवणार. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ
r.a.d.h.e..radhe._ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “बालपणीचे आयुष्य हे सर्वात सुंदर असते.” तर एका युजरने लिहिलेय, “ही चिमुकली किती गोड आहे.”आणखी एका युजरने लिहिलेय, “आजची वैजयंतीमाला” एक युजर लिहितो, “बालपण किती सुंदर असते” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हॉर्टचे इमोजी शेअर केले आहेत तर काहींना व्हिडीओ पाहून त्यांचे बालपण आठवले आहे. यापूर्वी सुद्धा सोशल मीडियावर शालेय जीवनातील असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.