Viral Video : काही लोकांना लहानपणापासून नक्कल करण्याची सवय असते. खरं तर नक्कल करणे हे खूप कठीण काम आहे. सध्या असाच एका तरुणाचा व्हिडीओ समोर आला आहे. मुलाखत सुरू असताना त्याची नक्कल मुलाखतकाराने पकडली. तुम्हाला वाटेल की हे काय प्रकरण आहे, त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (an interviewer caught a candidate a candidate for lip-syncing answers during online interview video goes viral)
या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्हाला एक तरुण दिसेल जो ऑनलाइन मुलाखतीसाठी कानात हेडफोन घालून बसलेला आहे. मुलाखत घेणारी व्यक्ती त्याला प्रश्न विचारते, तेव्हा तो उत्तर देतो पण मुळात उत्तर तो नाही तर त्याचा एक मित्र देतो. प्रश्न विचारल्यानंतर तरुणाचा मित्र त्या प्रश्नाचे उत्तर देत आहे.
मुलाखत घेणाऱ्याला जेव्हा आवाज आणि ओठांची हालचाल एकसारखी दिसली नाही तेव्हा त्याच्या लक्षात आले की हा तरुण नक्कल करतोय आणि उत्तर कोणी दुसरे देत आहे. मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीने त्याला नक्कल करताना पकडले आणि तरुणाचा प्लॅन फसला. हा व्हिडीओ जुना असून सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ
@MallikarjunaNH या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मुलाखतीदरम्यान ओठ हलवण्याची नक्कल करत होता. हा मेहनती तरुण कोणत्या राज्यातला आहे, अंदाज लावा.” दोन मिलियन लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून यावर अनेक लोकांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. अनेक युजर्सनी हा व्हिडीओ आंध्रप्रदेशमधील असल्याचे लिहिलेय. एका युजरने लिहिलेय, “मुलाखतीत तरी नक्कल करू नये” तर एका युजरने लिहिलेय, “हा व्हिडीओ १० वर्षांपूर्वीचा आहे आणि आता पु्न्हा व्हायरल झाला आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “हैदराबाद अशा गोष्टींसाठी लोकप्रिय आहे. जवळपास सर्वच मुलाखत घेणाऱ्यांना याविषयी माहिती आहे.” अनेक युजर्सनी या तरुणावर संताप व्यक्त केला आहे. काही युजर्सनी त्यांचे अनुभव शेअर केले तर काही युजर्सनी मुलाखतीदरम्यान अशी नक्कल कधीही करू नये, असा सल्ला दिला आहे.