सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ आपणाला पोट धरुन हसवणारे असतात तर काही अंगावर शहारा आणणारे असतात. सध्या असाच एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो खूप धक्कादायक आणि तुम्हाला आश्चर्यचकित करणारा आहे. कारण या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती समुद्रात पोहायला गेला असता त्याच्या चेहऱ्यावर आणि छातीवर समुद्रातील ऑक्टोपस चिकटल्याचं दिसत आहे. शिवाय ऑक्टोपस या व्यक्तीत्या चेहऱ्यावर खूप वाईटरित्या चिकटला आहे, ज्यामुळे त्याला शरीरापासून वेगळे करण्यासाठी डॉक्टरांना खूप अडणींचा सामना करावा लागल्याचं सांगण्यात येत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये तो व्यक्ती डॉक्टरांसमोर झोपल्याचं दिसतं आहे आणि त्याचा संपूर्ण चेहरा, छाती आणि पोट पूर्णपणे ऑक्टोपसच्या तावडीत सापडल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळी डॉक्टर या व्यक्तीच्या शरीरापासून ऑक्टोपसला काढण्यासाचा प्रयत्न करत आहेत. तर त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर ऑक्टोपस खूप वाईटरित्या चिकटल्याचं पाहायला मिळत आहे. ज्यामुळे त्याला खूप त्रास होत आहे.

tiger's Viral Video
‘शिकार करो या शिकार बनो’, बैलाची शिकार करण्यासाठी वाघाचा क्रूर हल्ला; VIDEO पाहून अंगावर येईल काटा
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Dog jumps to save drowning owner
पाण्यात पडलेल्या मालकाला वाचवण्यासाठी श्वानाने मारली उडी; VIDEO पाहून व्हाल अवाक्
Golgappa Vendors Arrested For Kneading Dough With Feet, Mixing Harpic 'For Taste' shocking video
पाणीपुरी खाणाऱ्यांनो सावधान! पायाने पीठ मळून घेतले आणि नंतर टॉयलेट क्लिनर मिसळले; VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल
Python attack viral vide | Pythons rescue video| Python shocking video
विहिरीत अडकलेल्या महाकाय अजगरांच्या रेस्क्यूचा थरार; शेपटीला पकडून ओढणार इतक्यात घडले असे काही की…; धडकी भरवणारा VIDEO
प्रत्येक जीव मौल्यवान असतो! बेशुद्ध सापाला CPR देऊन तरुणानं दिलं जीवदान! Viral Videoमध्ये पाहा थरारक बचाव मोहिम
‘प्रत्येक जीव मौल्यवान असतो!’ बेशुद्ध सापाला CPR देऊन तरुणानं दिलं जीवदान! Viral Videoमध्ये पाहा थरारक बचाव मोहिम
Viral Video Leopard Smartly Attacks Dog
‘शेवटी भूक महत्त्वाची’, बिबट्याने मानवी वस्तीत शिरून हुशारीने केला श्वानावर हल्ला; VIDEO पाहून उडेल थरकाप
King Cobra Bite On Eye Video Viral
सापाच्या डोळ्यांत डोळे घालून बघण्याची हौस बेतली जीवावर! फणा काढला अन्…; पाहा धडकी भरवणारा VIDEO

हेही पाहा- धावत्या ट्रकच्या केबिनमध्ये शिरला भलामोठा अजगर, पोलिसांच्या सतर्कतेमुळे बचावला ड्रायव्हर, थरारक VIDEO पाहाच

अखेर ऑक्टोपसची सुटका…

व्हिडीओत दिसत आहे की, डॉक्टर हळूहळू त्या माणसाच्या शरीरावर चिकटलेल्या ऑक्टोपसला वेगळं करत आहेत. तर यूजरने या व्हिडिओचा दुसरा भाग पोस्ट केला आहे, ज्यामध्ये डॉक्टर त्या माणसाच्या चेहऱ्यावरून ऑक्टोपस काढत आहेत. व्हिडीओच्या शेवटी असे दिसून येते की, खूप कष्टानंतर डॉक्टर त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आणि छातीवर चिकटलेल्या ऑक्टोपसला पूर्णपणे काढून टाकतात. ऑक्टोपसला काढल्यानंतर तो व्यक्ती खूप आनंदी झाल्याचं दिसत आहे. तर समुद्रात पोहायला गेल्यावर अनेक लोकांच्या शरीराला यापूर्वीही ऑक्टोपस चिकटल्याच्या अनेक घटनांचे व्हिडिओ समोर आले आहेत.