सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ आपणाला पोट धरुन हसवणारे असतात तर काही अंगावर शहारा आणणारे असतात. सध्या असाच एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो खूप धक्कादायक आणि तुम्हाला आश्चर्यचकित करणारा आहे. कारण या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती समुद्रात पोहायला गेला असता त्याच्या चेहऱ्यावर आणि छातीवर समुद्रातील ऑक्टोपस चिकटल्याचं दिसत आहे. शिवाय ऑक्टोपस या व्यक्तीत्या चेहऱ्यावर खूप वाईटरित्या चिकटला आहे, ज्यामुळे त्याला शरीरापासून वेगळे करण्यासाठी डॉक्टरांना खूप अडणींचा सामना करावा लागल्याचं सांगण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल व्हिडिओमध्ये तो व्यक्ती डॉक्टरांसमोर झोपल्याचं दिसतं आहे आणि त्याचा संपूर्ण चेहरा, छाती आणि पोट पूर्णपणे ऑक्टोपसच्या तावडीत सापडल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळी डॉक्टर या व्यक्तीच्या शरीरापासून ऑक्टोपसला काढण्यासाचा प्रयत्न करत आहेत. तर त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर ऑक्टोपस खूप वाईटरित्या चिकटल्याचं पाहायला मिळत आहे. ज्यामुळे त्याला खूप त्रास होत आहे.

हेही पाहा- धावत्या ट्रकच्या केबिनमध्ये शिरला भलामोठा अजगर, पोलिसांच्या सतर्कतेमुळे बचावला ड्रायव्हर, थरारक VIDEO पाहाच

अखेर ऑक्टोपसची सुटका…

व्हिडीओत दिसत आहे की, डॉक्टर हळूहळू त्या माणसाच्या शरीरावर चिकटलेल्या ऑक्टोपसला वेगळं करत आहेत. तर यूजरने या व्हिडिओचा दुसरा भाग पोस्ट केला आहे, ज्यामध्ये डॉक्टर त्या माणसाच्या चेहऱ्यावरून ऑक्टोपस काढत आहेत. व्हिडीओच्या शेवटी असे दिसून येते की, खूप कष्टानंतर डॉक्टर त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आणि छातीवर चिकटलेल्या ऑक्टोपसला पूर्णपणे काढून टाकतात. ऑक्टोपसला काढल्यानंतर तो व्यक्ती खूप आनंदी झाल्याचं दिसत आहे. तर समुद्रात पोहायला गेल्यावर अनेक लोकांच्या शरीराला यापूर्वीही ऑक्टोपस चिकटल्याच्या अनेक घटनांचे व्हिडिओ समोर आले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: An octopus stuck on the face of a person who went to bathe in the sea video went viral jap