Viral Video : सध्या लग्नसराई सुरू आहे. सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. कोणी डान्स करताना दिसतात तर कोणी गाणी म्हणताना दिसतात. कोणी उखाणे घेताना दिसतात. लग्नातील अनेक गमती जमतीचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक आजी तिच्या नातीच्या लग्नात तुफान डान्स करताना दिसत आहे. आजीचा डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल. काही लोकांना या आजीचा डान्स पाहून त्यांच्या आज्जीची आठवण येईल. (an old lady amazing dance in grand daughters wedding video goes viral on social media)

नातीच्या लग्नात आज्जीने केला भन्नाट डान्स

हा व्हायरल व्हिडीओ एका लग्नातील आहे. या व्हिडीओमध्ये स्टेजवर एक आज्जी एका जोडप्यासह डान्स करत आहे. आजीचा हा डान्स पाहून कोणीही थक्क होईल. आजीच्या प्रत्येक डान्स स्टेप्स पाहून तुम्हीही आजीचे चाहते व्हाल. या जोडप्याबरोबर आजी मनसोक्त डान्स करताना दिसत आहे. आजीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून नवरदेव आणि नवरीसुद्धा आनंदी दिसत आहे. आजीची ऊर्जा आणि डान्स करण्याची आवड थक्क करणारी आहे. या व्हिडीओवर लिहिलेय, “नातीच्या लग्नाचा आनंद”

bride told love story through ukhana
“पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले ..” उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी, VIDEO एकदा पाहाच
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Video of Nagpur Mr Calendar kaka
नागपूरच्या ‘कॅलेंडर’ काकांना तोंडपाठ आहे संपूर्ण कॅलेंडर; अचूक सांगतात माहिती, VIDEO एकदा पाहाच
Groom dance for bride on hoshil ka ya pathyachi sobar gharwali marathi song video goes viral on social media
VIDEO: “बायको पाहिजे नखरेवाली” मराठमोळ्या गाण्यावर नवरदेवाचा भन्नाट डान्स; काय ते प्रेम, काय तो डान्स…आहाहा!
two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
Girls group dance on marathi song Udhalit Yere Gulal Sajana Tu Sham Mi Radhika video goes viral
VIDEO: काय ती अदा, काय तो डान्स! “उधळीत येरे गुलाल सजना तू शाम मी राधिका” मराठमोळ्या गाण्यावर तरुणींचा तुफान डान्स

हेही वाचा : ‘२०० रुपये जास्त मागितले, माराहाण करण्याची दिली धमकी’, रिक्षावाल्याने २० वर्षीय तरुणाला छळले, धक्कादायक घटनेचा Video Viral

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

हेही वाचा : VIDEO:”काही क्षणांसाठी आयुष्याचा खेळ करु नका” नवरदेवाला ग्रँड एन्ट्री पडली महागात; थेट फेट्याला आग लागली अन् पुढच्याच क्षणी…

chaitu.2608 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “हौसेला मोल नाही तस हौसे ला वय नाही..” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आजींना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच स्वामींचरणी प्रार्थना.” तर एका युजरने लिहिलेय, “आजीची नात खूप नशीबवान आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “कुटुंब फक्त असूनही उपयोग नाही. खऱ्या मनाने एकत्र येऊन आपल्या घरच्या कार्यक्रमात मनाने एकत्र येऊन कार्यक्रमाची हौस वाढविणे हा औरच आनंद आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “आजीची नात खूप नशिबवान आहे” अनेक युजर्सनी आजीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. काही युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.

Story img Loader