Viral Video : नुकतीच देशभरात मोठ्या उत्साहाने दिवाळी साजरी करण्यात आली. दिवाळीनिमित्त घरोघरी पाहुणे दिसत आहे. घरोघरी दिवे, लाइटिंग लावलेली दिसून येत आहे. चकली, लाडू, चिवडा असा फराळ बनवलेला दिसून येत आहे. एवढंच काय तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व जण फटाके फोडताना दिसत आहे. तुम्ही फटाके फोडतानाचे अनेक व्हायरल व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिले असेल पण सध्या एका आजीबाईच्या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या आजीबाईने चक्क हातात फटाक्यांची माळ धरली आहे आणि फटाके फोडताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. (an old lady burst firecrackers in hand shocking video goes viral on social media)

खरं तर वृद्ध व लहान मुलांना फटाक्यांचा आवाज असहनीय असतो. त्यामुळे इतरांना त्रास होऊ नये म्हणून फटाके न फोडण्याचा सल्ला दिला जातो पण हा व्हिडीओ पाहून तु्म्हीही अवाक् व्हाल. चक्क वृद्ध महिलाच फटाके फोडताना दिसत आहे आणि तेसुद्धा हातात फटाके धरुन फोडत आहे. आजीचं धाडस पाहून कोणीही अवाक् होईल पण असे हातात धरुन फटाके फोडणे चुकीचे आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही असे कृत्य करू नये. यामुळे शारीरिक इजा होऊ शकते.

हेही वाचा : ‘संकटात सगळ्यांचे नशीब साथ देत नाही…’ तरसाच्या कळपाने केला सिंहावर हल्ला करण्याचा प्रयत्न… पुढे जे घडलं; VIDEO पाहून उडेल थरकाप

u

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

हेही वाचा : भयंकर! वेफर्स घ्यायला प्लॅटफॉर्मवर उतरली अन् तेवढ्यात ट्रेन सुरु झाली; तरुणीनं पुढे काय केलं पाहा, VIDEO झाला व्हायरल

world_tuluvas_network या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आजी म्हणत असेल की मी आधीच माझी दृष्टी गमावली आहे. आता माझ्याकडे काहीच गमावण्यासारखे नाही” तर एका युजरने लिहिलेय, “वय हा फक्त आकडा आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “आजपर्यंत पाहिलेली सर्वात धाडसी आज्जी” एक युजर लिहितो, “कल्पना करा आज्जी तरुणवयात कशी असेल” तर एक युजर लिहितो, “कृपया असं करू नका. हे धोकादायक आहे” एक युजर लिहितो, “आज्जी हे चुकीचं आहे” काही युजर्सनी आज्जीच्या धाडसाचे कौतुक केले आहेत तर काही युजर्सनी असे स्टंट धोकादायक आहे असे सांगत आज्जीवर टिका केली आहेत.