Viral Video : वारी ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. पंढरीची वारी हा विठ्ठल भक्तांसाठी सर्वात मोठा उत्सव असतो. वारकरी दरवर्षी वारीची आतुरतेने वाट बघतात. वारीमध्ये हजारो वारकरी हरिनामाचा गजर करत पंढरपूरच्या दिशेने पायी चालतात आणि आषाढी एकादशीला पंढरपूरला पोहचतात. आषाढीची चाहूल लागताच वारकऱ्यांचे पाऊल पंढरपूरकडे वळतात. सध्या वारीला सुरूवात झाली आहे त्यामुळे सोशल मीडियावर वारीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. सध्या असाच एका आजीबाईचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या आजीबाई तब्बल ३० वर्षांपासून वारीत सहभागी होतात ३० वर्षांपासून वारी करणाऱ्या आजीबाईच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (an old lady coming in Pandharpur Wari from last 30 years)

हा व्हायरल व्हिडीओ वारीतील आहे. या व्हिडीओमध्ये एका आजीबाईला तरुण विचारतो, “किती वर्षांपासून वारी करताहेत?” त्यावर आजी सांगते, “३० वर्षांपासून” त्यानंतर तरुण आजीला विचारतो, “वारीत आल्यावर कसे वाटते?” त्यावर आजी आनंद व्यक्त करत चक्क नाचताना दिसते. आजीच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून तुम्हाला कळेल ही वारीसारखे दुसरे कोणते सुख नाही. आजी नाचून त्यांचा आनंद व्यक्त करताना दिसतात. आजीला पाहून तुम्हालाही ऊर्जा येईल. या आजीच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावेनासा आहे. तिच्या शेजारी दोन तीन आजी दिसत आहेत. त्या सुद्धा खूप आनंदी दिसत आहेत.

हेही वाचा : VIDEO: ‘शिकार करो या शिकार बनो’ बिबट्याची चलाख चाल अन् मगरीचा शेवट; खतरनाक युद्धात शेवटी कोण पडलं कुणावर भारी?

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : तरुणीची एक चूक अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जिममध्ये ट्रेडमिलवर धावताना तरुणीबरोबर घडलं असं की..,पाहा मृत्यूचा थरारक VIDEO 

naad_kirtanacha या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “चेहऱ्यावर आनंद” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “धन्य झालो आजीची विठ्ठलांप्रती निस्सीम भक्ती बघून… राम कृष्ण हरी ” तर एका युजरने लिहिलेय, “खरच खूप भारी वाटलं व्हिडिओ बघून” आणखी एका युजरने लिहिलेय, “तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी, त्याची चक्रपाणी वाट पाहे” अनेक युजर्सना आजीचा हा व्हिडीओ खूप आवडला आहे. काही युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.