Viral Video : सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत अनेक जण डान्स करताना दिसून येतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक आजी भन्नाट डान्स करताना दिसत आहे. आजीचा डान्स पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.
असं म्हणतात, वयाला बंधन नसते. वय हा फक्त आकडा असतो. या व्हायरल व्हिडीओमधील आजीबाईचा डान्स पाहून तुम्हालाही ही गोष्ट पटेल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओ
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक आजी स्टेजवर बिनधास्त डान्स करताना दिसत आहे. आजीच्या पाठीमागे काही महिला, मुली आणि लहान मुले डान्स करताना दिसत आहे. आजीच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हीही थक्क व्हाल. आजी इतका सुंदर डान्स करतेय की तरुणाईलाही लाजवेल. आजी प्रत्येक डान्स स्टेप्स उत्साहाने करतेय. तिची ऊर्जा पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. जर तुम्ही हा व्हिडीओ शेवटपर्यंत पाहाल तर तुम्हीही आजीबाईचे फॅन व्हाल.
पाहा व्हायरल व्हिडीओ
हेही वाचा : Labour Day 2024 : कामगार दिनाच्या द्या हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर मेसेज
shallowwaters_s या इन्स्टाग्राम अकाउंट वरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “वय हा फक्त आकडा आहे” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “ती वृद्ध आहे पण तिची एनर्जी २६ वर्षाची आहे” तर एका युजरने लिहिलेय, “काय ऊर्जा आहे. तिने स्टेज गाजवला” आणखी एका युजरने लिहिलेय, “आजीचा डान्स पाहून मन आनंदी झाले” अनेक युजर्सनी आजीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. काह युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.