Mumbai Local Train Video : स्त्री ही सृष्टीची शक्ती मानली जाते. असे कोणतेच काम नाही की जी स्त्री करू शकत नाही. स्त्रीमध्ये प्रचंड शक्ती आणि ऊर्जा आहे. अनेकदा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा ती सहस शक्य करून दाखवते. सध्या असाच एक प्रकरण समोर आले आहे. चालत्या लोकल ट्रेनमध्ये एका वयोवृद्ध आईने गरोदर महिलेची प्रसुती केली आणि महिलेने सुखरुप बाळाला जन्म दिला. या बाळाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे आणि प्रसुती करणाऱ्या महिलेचे कौतुक केले जात आहे.
गरोदर महिलेची प्रसुती करणाऱ्या वृद्ध आईच्या मुलीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत याविषयी माहिती दिली. तिने तिच्या आईबरोबर नवजात बाळाचा व्हिडीओ शेअर करत याविषयी माहिती दिली. तिने कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आज पहाटे माझ्या आईने लोकल ट्रेन मध्ये प्रसुती केली ते ही बरोबर कोणतेही साहित्य नसताना हे सुखरुपपणे पार पडले. तिला मदत करणारे काही महिलांचे व माझ्या आईचे खूप कौतुक. आई मला तुझा खूप अभिमान आहे.” हा व्हिडीओ तीन दिवसापूर्वी शेअर करण्यात आला आहे.
हेही वाचा : प्रत्येक आई असते एक हिरकणी ! बाळाला कुशीत घेऊन कानातले विकताना दिसली आई, लोकल ट्रेनमधील Video व्हायरल
कोणतेही साहित्य नसताना चालत्या लोकल ट्रेनमध्ये बाळाची प्रसुती करणे, हे खरंच खूप अवघड काम आहे पण त्या वृद्ध आईला सलाम करावा लागेल की त्यांनी हिंमत दाखवली. सध्या त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतान दिसून येत आहे.
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.एका युजरने लिहिलेय, “अभिमान आहे नारी शक्तीचा” तर एका युजरने लिहिलेय, “आई ही आई असते.” आणखी एका युजरने लिहिलेय, “जगातील सर्वात मोठी योद्धा आई असते”
व्हिडीओ शेअर करणाऱ्या मुलीने कमेंटमध्ये युजर्सना सांगितले, “गरोदर महिला चेकअप ला जात होती.अचानक तिला वेदना सुरू झाल्या त्यामुळे त्यांची प्रसुती केली.