Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल. हा व्हिडीओ एका किर्तनाच्या कार्यक्रमातील आहे. किर्तन सुरु असताना एक आज्जीबाई लोटांगण घालताना दिसत आहे. विशेष म्हणजे लोटांगण घालताना ती डोक्यावरचा पदर खाली पडू देत नाही. हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल.

लोटांगण घालत आज्जी रमली भजनात

वारकरी संप्रदाय हा विठ्ठलाला समर्पित असा भक्तांचा संप्रदाय आहे. हे वारकरी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारीला जातात. गावोगावी किर्तनं करतात, भजनगीत गातात. असाच एका किर्तन कार्यक्रमातील व्हिडीओ पाहून क्षणभरासाठी थक्क होईल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक महिला किर्तनकार दिसेल ज्या किर्तन करताना दिसत आहे. किर्तनादरम्यान ही आज्जीबाई लोटांगण घालताना दिसते. विशेष म्हणजे आज्जीबाई लोटांगण घालताना पदर डोक्यावरून खाली पडू देत नाही. सर्व जण आज्जीकडे कौतुकाने पाहताना दिसत आहे. आजीची ही ऊर्जा पाहून कोणीही थक्क होईल.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

yoginitai_vasatkar_official77 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “तुका म्हणे वृध्द होती तरणे रे …!” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “माऊलीने डोक्यावरचा पदर सुद्धा पडू दिला नाही” तर एका युजरने लिहिलेय, “ही आहे आपली संस्कृती राम कृष्ण हरी” आणखी एका युजरने लिहिलेय, “खूप मस्त.. आपल्या महाराष्ट्राची संस्कृती हीच आहे जिच्या डोक्यावर पदर तिलाच म्हणतात इंडियन मदर जय महाराष्ट्र” एक युजर लिहितो, “अशा आईमुळे वारकरी संप्रदायाची परंपरा टिकून आहे. आईच्या चरणी नमन” तर एक युजर लिहितो, “काय बोलू मी मला तुझ्यात विठ्ठल रुख्मिनी दिसते आई ही आहे महाराष्ट्राची संस्कृती आजीने डोक्यावरचा पदर पडू दिला नाही. आजी भजनात आनंद घेण्यासाठी वय लागत नाही. डोक्यावर पदर जशास तसा आहे. ही आहे आपली संस्कृती राम कृष्ण हरी”