Viral Video : सोशल मीडियावर दरदिवशी अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. लहान मुलांपासून वृद्धापर्यंत अनेक जण कधी डान्स करताना दिसतात तर कधी कोणी गाणी म्हणताना दिसतात. कधी कोणी स्टंट करताना दिसतात तर कधी कोणी जुगाड दाखवताना दिसतात. पण काही व्हिडीओ असे असतात की पाहून चेहऱ्यावर स्मित हास्य येते. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये नऊवारी नेसलेली एक आज्जी रोप वे चा आनंद लुटताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. (an old lady enjoying Ropeway by wearing nauwari video goes viral on social media life is so beautiful just we have to learn to live)
मराठमोळ्या आज्जीने लुटला रोप वे चा आनंद
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक रोप वे चा स्पॉट दिसेल. तिथे एक नऊवारी नेसलेली आज्जी रोप वे ने एका टोकावरून दुसऱ्या टोकावर जाताना दिसत आहे. आज्जीने लुटलेला रोप वे चा आनंद पाहून तुम्हीही थक्क व्हाल. वय हा फक्त आकडा असतो. आयुष्य खूप खूप सुंदर आहे फक्त जगता आलं पाहिजे, असं तुम्हाला वाटेल. सध्या या मराठमोळ्या आज्जीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हेही वाचा : India Post Payments Bank धारकांनो सावधान! अन्यथा तुमचेही अकाउंट होईल रिकामी; टाळण्यासाठी घ्या ‘ही’ काळजी
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
yashbarde55 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आजी खूप छान वाटले. हिम्मत महत्वाची असते नेहमी” तर एका युजरने लिहिलेय, “पदर घेऊनच गेल्या” आणखी एका युजरने लिहिलेय, “हिम्मत भारी आहे आजीची” एक युजर लिहितो, “वय हा फक्त आकडा असतो. वयाचे बंधन न ठेवता आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेता आला पाहिजे, तोच खऱ्या अर्थाने जीवन जगतो.” अनेक युजर्सनी आज्जीचे कौतुक केले आहेत. काही युजर्सनी हार्टेचे इमोजी शेअर केले आहेत. यापूर्वी सुद्धा असे वृद्धांचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. वृद्धांचे व्हिडीओ नेटकऱ्यांच्या लवकर पसंतीस उतरतात.