Viral Video : प्राणी मात्रांवर दया करावी, असे आपल्याला लहानपणापासून शिकवले जाते. कारण प्राणी मात्रांवर दया दाखवणे, हीच खरी ईश्वरसेवा आहे. तु्म्ही आजवर कुत्रा, मांजर, माकड, चिमणी, कावळा, पोपट इत्यादी प्राणी पक्षांना आवडीने खाऊ घालणाऱ्यांचे व्हिडीओ अनेकदा पाहिले असेल पण तुम्ही कधी मुंग्याना अन्न खाऊ घालताना कोणाला पाहिले आहे का? होय. सध्या असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे की हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक आजीबाई चक्क मुंग्यांना साखर खाऊ घालताना दिसत आहे. आजीचे मुंग्यांवरील प्रेम पाहून तुम्हीही थक्क व्हाल. (an old lady feeding sugar to ants show mercy and kindness to animals and birds video goes viral)

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की आजी तुळशीला पाणी घालत आहे. त्यानंतर ती तुळशीजवळची साखरेनी भरलेली वाटी उचलते आणि त्यातील साखर अंगणातील मुंग्याना खाऊ घालते. मुंग्यांवरील तिची दया पाहून कोणीही थक्क होईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर लिहिले, “मुंगीमध्ये सुद्धा भगवंताचे स्वरुप पाहणारी माणसे”

raising children, children, children and parents,
मुलांना वाढवताना नक्की काय चुकतंय?
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Man putting hand inside crocodiles mouth crocodile shocking video
VIDEO: “कुणाच्याच संयमाचा अंत पाहू नका”, तरुणानं मगरीबरोबर केलेलं कृत्य पाहून तुम्हीच सांगा नेमकी चूक कुणाची?
Heart warming video of father and son after passing exam emotional video
“आयुष्यभराचं बापाचं कर्ज, मुठभर गुलालात फेडलं” बाप-लेकाचा हा VIDEO पाहून प्रत्येकाच्या डोळ्यांत येईल पाणी
success story of Diganta Das owner of Daily Fresh Food
Success Story : शून्यातून शिखरापर्यंत…! कामगार ते स्वतःचा ब्रँड; वाचा पराठ्यांचा व्यवसाय सुरू करणाऱ्या दास यांचा प्रवास
parents children self reliant chaturang article
सांदीत सापडलेले : काळजी
Proud father daughter selected in police emotional video goes viral
“वडिलांच्या डोळ्यातील अश्रू सांगतात संघर्ष किती मोठा होता” लेक पोलीस झाल्यानंतर अश्रू अनावर; VIDEO पाहून डोळ्यांत येईल पाणी
a boy can not swim but jumped into the well as a friend said
पोहता येत नव्हते पण मित्र म्हणाला म्हणून विहिरीत उडी मारली; चिमुकल्याचा मैत्रीवरचा विश्वास, VIDEO होतोय व्हायरल

या पृथ्वीतलावावर इवल्याशा मुंग्यांपासून हत्ती सारख्या बलाढ्य प्राण्यापर्यंत प्रत्येक जीव महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक जीवाविषयी दया प्रेम असणे तितकेच महत्त्वाचे आहे. थोर लोक सांगून गेले की प्राणी मात्रांवर दया करावी तरीसुद्धा काही लोक प्राण्यांना अमानुषपणे छळताना दिसतात पण काही लोक प्राणी मात्रांवर जीवापाड प्रेम दाखवत त्यांची काळजी घेताना दिसतात. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला याची जाणीव होईल.

हेही वाचा : “काँग्रेसचे लोक माझ्या खिशात” शिक्षिकेचा शाळेत दारू पिऊन धिंगाणा, मुख्याध्यापकाची पकडली कॉलर अन्…; पाहा धक्कादायक VIDEO

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : मुंबई लोकलमुळे प्रियकर नाराज; धो धो कोसळणाऱ्या पावसात ‘ती’ भेटही गेली वाहून, मेसेज वाचून सांगा, हसावं की रडावं?

krishnawagh961 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “या नंतर हे सगळं कधीच पाहायला भेटणार नाही कारण आपली संस्कृती मिटत चालली आहे” तर एका युजरने लिहिलेय, “ही शेवटची पिढी आहे जिने प्राणीमात्रांवर पण दया केली.” आणखी एका युजरने लिहिलेय, “खूप गोड आजीबाई” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.