Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ इतके मजेशीर असतात की पोट धरुन हसायला येते. सध्या असाच एका आजीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आजीने असं काही केलं की तुम्हाला हसू आवरणार नाही. सोशल मीडियावर लहानांपासून वृद्ध लोकांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात.तुम्ही गाणी गाताना किंवा डान्स करतानाचे अनेक व्हिडीओ पाहिले असेल पण असा व्हिडीओ तुम्ही पहिल्यांदाच पाहाल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक आजी स्वयंपाकघरात चहा बनवताना दिसत आहे. चहा बनल्यानंतर ती चहा कपामध्ये गाळते आणि कप घेऊन आजोबाकडे जाते पण ती हातात कप घेऊन जात नाही तर चक्क डोक्यावर कप धरुन जाते. तुम्हाला वाटेल, हे कसं शक्य आहे? पण हे खरंय.सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे, आजी चहाने भरलेला कप डोक्यावर धरते आणि कपाला हात न लावता नाचत नाचत आजोबांकडे जाते. आजीला डोक्यावर चहा घेऊन येताना पाहून आजोबांना सुरुवातीला धक्का बसतो पण नंतर ते सुद्धा आजीबरोबर नाचायला सुरूवात करतात. या व्हिडीओमध्ये एक चिमुकला आणि तरुण मुलगा सुद्धा दिसतो. ते आजी आजोबांना पाहून डोक्याला हात लावतात.सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
हेही वाचा : Video : रत्नागिरी जिल्ह्यातील राजेवाडी गावातला हा गरम पाण्याचा कुंड पाहिला का? व्हिडीओ एकदा पाहाच
sidbobadi21 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “ट्रेंडिग विथ आई आजी” या व्हिडीओवर युजर्सनी अनेक मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “असंच शेवट पर्यंत सोबत हसत खेळत जगायचं असतं. सुख आणि दु:ख येतात आणि जातात पण वेळ मात्र गेली परत येत नाही” तर एका युजरने लिहिलेय, “खूपचं छान, रडवणं सोपं असतं पण हसवणे कठीण” आणखी एका युजरने लिहिलेय, “खूप छान या वयात पण त्याचा उत्साह आहे आणि खरोखरच आयुष्य आनंद घेऊन जगत आहे. आजच्या पिढीला प्रेरणा”