Viral Video : असं म्हणतात, मनात जिद्द असले तर कोणतीची गोष्ट अशक्य नसते मग वयाचंही बंधन नसतं. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक आजी तुफान पोहताना दिसतेय.सोशल मीडियावर लहान मुलांपासून वयोवृद्ध व्यक्तींचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. पोहतानाचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असेल पण तु्म्ही कधी आजीला नऊवारी नेसून पोहताना पाहिले आहे का? पण या व्हायरल व्हिडीओमध्ये आजीला पोहताना पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वय हा फक्त आकडा असतो, हे या व्हिडीओतू स्पष्ट दिसतेय. वयाचं बंधन न ठेवता आजी बिनधास्त पोहताना दिसत आहे. व्हिडीओत तुम्हाला नदी शेजारी उभी असलेली आजी दिसत असेल. पुढे ती या नदीत उडी मारते आणि पोहायला सुरुवात करते. विशेष म्हणजे आजीने नऊवारी नेसलेली आहे आणि नऊवारी नेसून आजी बिनधास्त पोहत आहे.सध्या आजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : मुलगी हीच घराची खरी भाग्यलक्ष्मी! चिमुकलीचा रोटी लाटतानाचा व्हिडीओ होतोय व्हायरल

_marathi_491 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर कॅप्शन लिहिलेय, “वय किती पण असू द्या. जर स्वत:वर विश्वास आणि मनात जिद्द असेल तर कोणते पण काम आपण सहज करू शकतो. पोहताना आजी”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “लय भारी आजी” तर एका युजरने लिहिलेय, “खूप छान आज्जी. हीच खरी महाराष्ट्राची संस्कृती” आणखी एका युजरने लिहिलेय, “सर्वांना पोहता आलं पाहिजे”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: An old lady wearing nauvari swimming in a river video goes viral age does not matter only need stubbornness ndj
Show comments