Viral Video : “लहानपण देगा देवा। मुंगी साखरेचा रवा। ” या ओळी तुम्ही अनेकदा ऐकल्या किंवा वाचल्या असतील. प्रत्येकाला बालपण पुन्हा जगावसं वाटतं. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात की हे व्हिडीओ पाहून कुणालाही त्यांच्या बालपणीची आठवण येऊ शकते.सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये झाडाच्या फांदीला लटकून आजोबा झोका घेताना दिसत आहे. आजोबांना असा झोका घेताना पाहून अनेकांना त्यांचे बालपण आठवेल.सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत, अनेकांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी डान्स करताना तर कधी गाणी म्हणताना दिसून येतात पण तुम्ही कधी वृद्ध लोकांना बालपणीचा आनंद घेताना पाहिले आहे का? हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या व्हिडीओमध्ये तुम्हाला हे आजोबा मनसोक्त बालपण जगताना दिसून येईल. त्यांचा हा व्हिडीओ पाहून अनेकांना झाडाच्या फांद्याना लटकून झोका घ्यावासा वाटू शकतो.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक आजोबा झाडाच्या फांदींना लटकून झोका घेताना दिसत आहे. आजोबा स्वत: त्या झाडाकडे जातात. झाडाची फांदी पकडतात आणि मनसोक्त झोका घेतात. आजोबांना झोका घेताना पाहून आजुबाजूनचे लोक स्मित हास्य करुन त्यांच्याकडे बघत आहे. हा व्हिडीओ एका गावातील रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाशेजारचा आहे. आजोबाच्या वय सत्तरीच्या जवळपास असावे पण आजोबाची ऊर्जा पाहून तुम्हाला त्यांच्या वयाच्या अंदाज घेता येणार नाही.
seed.creates या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आजोबा त्यांचे आयुष्य खूप सुंदर जगत आहे” तर एका युजरने लिहिलेय, “ते त्यांचे बालपणीच्या आठवणी पुन्हा जगण्याचा प्रयत्न करत आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “वय महत्त्वाचे नसते, तुम्हाला प्रत्येक क्षणाचा आनंद घेता आला पाहिजे” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.