Viral Video : उखाणा घेणे हा महाराष्ट्राच्या संस्कतीचा एक भाग आहे. कोणत्याही शुभ प्रसंगी किंवा लग्नसमारंभात आवडीने उखाणा घेतला जातो. पूर्वी फक्त महिला पतीचे नाव घेत उखाणा घ्यायच्या पण आता पुरुष मंडळी सुद्धा आवडीने पत्नीचे नाव घेत उखाणा घेताना दिसतात. सोशल मीडियावर उखाणा घेतानाचे पुरुष तसेच स्त्रियांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही उखाण्याचे व्हिडीओ मजेशीर असतात तर काही उखाणे थक्क करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक आजोबा भन्नाट उखाणा घेताना दिसत आहे. आजोबांचा हा उखाणा ऐकून तुम्हीही पोट धरून हसाल.

आजोबांनी घेतला भन्नाट उखाणा

हा व्हायरल व्हिडीओ एका सार्वजानिक कार्यक्रमातील आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला एक आजोबा हातात माइक घेऊन बोलताना दिसत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की आजोबा मजेशीर उखाणा घेतात. उखाणा घेताना ते म्हणतात,
“मी शंकर यशवंत कवडे
गाव हाय गुरसाळं
पंढरपूर तालुका अन् सोलापूर जिल्हा
अन् पारबतीचं(पार्वतीचं) नाव घेतो हिल पोरी हिला”
आजोबांचा हा उखाणा ऐकून सर्वजण एकच जल्लोष करतात.
या आजोबांच्या उखाण्यातून तुम्हाला कळेल की हे आजोबा सोलापूर जिल्ह्याच्या पंढरपूर तालुक्यातील एका गुरसाळे गावचे रहिवासी आहे. आजोबांचा हा मजेशीर उखाणा ऐकून तुम्हाला हसू आवरणार नाही.

Bull attack on woman
‘त्याने थेट महिलेला उडवलं…’ धक्कादायक घटनेचा VIDEO पाहून अंगावर येईल काटा
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
a young guy express his feelings about todays marriage
Video : “आजच्या काळातला हुंडा म्हणजे…” तरुणाने सांगितली लग्नाची सत्य परिस्थिती, पुणेरी पाटीचा व्हिडीओ चर्चेत
Nagin Dance aaji
साठ वर्षाच्या आजीबाईंचा नागीण डान्स पाहिला का? Viral Video पाहून पोट धरून हसाल
a beautiful sadhvi who came in mahakumbh mela became famous
Video : सुखी जीवन सोडून २८ व्या वर्षी साध्वी झालेली सौंदर्यवती चर्चेत, महाकुंभ मेळ्यातील व्हिडीओ व्हायरल
shocking Video : Grandfather saves grandchild
Video : म्हणूनच घरात आजी-आजोबा असावेत! हिटरला हात लावायला गेला नातू, आजोबा धावत आले अन्… व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
Video : an old couple dance on angaro ka ambar sa song in pushpa movie
Video : क्या बात! आज्जी आजोबांनी ‘पुष्पा’ गाण्यावर केला भन्नाट डान्स, नेटकरी म्हणाले, “जोडी असावी तर अशी..”
Shocking Video
Video : तुफान राडा! दोन तरुणी भिडल्या अन् एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बॉयफ्रेंडसाठी..”

हेही वाचा : याला म्हणतात डान्स! ‘नऊवारी साडी पाहिजे’ गाण्यावर परदेशातील चिमुकलीने केला हटके डान्स; Viral Video पाहून युजर्स करतायत कौतुक

पाहा व्हायरल व्हिडीओ

anchor_monika_jaju या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आजोबा पण म्हणतात हिल पोरी हिला …” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “वा काय खणखणीत आवाज आहे न कळत विठ्ठल उमप यांचीच आठवण झाली.” तर एका युजरने लिहिलेय, “नाद करायचा नाही आजोबांचा” आणखी एका युजरने लिहिलेय, “आजोबांनी तरुण पण लय गाजवलं असेल..” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.

हेही वाचा : Top Markets In Pune : पुण्यातील सर्वात स्वस्त मार्केट्स! दिवाळीच्या खरेदीसाठी ‘या’ ठिकाणांना द्या अवश्य भेट

यापूर्वी असाच एका आजीबाईचा एक भन्नाट उखाणा व्हायरल झाला होता. आजीबाई उखाणा घेताना म्हणाली होती, ““इंग्रज भाषेत टोमॅटोला म्हणतात टोटो, छत्रभूज पाटलांच्या हातामध्ये आहे इंदीराबाईचा फोटो” त्यावेळी हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेक आला होता.

Story img Loader