Viral Video : पत्नी पत्नीचे नाते हे जगावेगळे असते. लग्नानंतर दोन व्यक्ती एकत्र येतात आणि नव्या आयुष्याची सुरूवात करतात आणि मरेपर्यंत एकमेकांची साथ देतात. पत्नी पत्नीच्या नात्यातील गोडवा, प्रेम आणि जिव्हाळा दाखवणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक आजोबा त्यांच्या वृद्ध पत्नीला मदत करताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल. काही लोकांना त्यांचे आई वडील तर काही लोकांना त्यांचे आजी आजोबा आठवतील.

वृद्ध पती पत्नीच्या नात्यातील गोडवा

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की आजोबा अंगणामध्ये बसून तांदूळ निवडत आहे. व्हिडीओमध्ये तुम्हाला आजी एका खूर्चीवर बसलेली दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हाला कळेल की सुरूवातीला आजी तांदूळ निवडत होती. ती थकली म्हणून खूर्चीवर बसून आराम करत आहे आणि आजोबा तिला मदत व्हावी म्हणून स्वत: तांदूळ निवडत आहे. वृद्ध पती पत्नीच्या नात्यातील हा गोडवा पाहून तुम्हीही भारावून जाल. आजोबा ज्या प्रकारे आजीला मदत करत आहेत, ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या व्हिडीओवर कॅप्शनमध्ये लिहिलेय, “जोडीदार असावा तर असा जो म्हातारपणापर्यंत साथ देईल.” सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. म्हातारपणात जोडीदारांना एकमेकांची साथ हवी असते. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही असे वाटेल की जोडीदार असावा तर असा. आजी आजोबांचा हा व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला होता. व्हिडीओवर नेटकरी कौतुकाचा वर्षाव करत आहे.

Name Change After Marriage
लग्नानंतर नाव बदलायचं नव्हतं, पण सासरच्यांनी केला विरोध अन्…
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Mumbai rain video | Mumbaikar Young guys ran to help people stuck in the rain
Mumbai Video : “नाक्यावरची मुले वाईट नसतात” पावसात अडकलेल्या लोकांच्या मदतीला धावले तरुण, मुंबईचा VIDEO एकदा पाहाच
Commercial Pilot License Holder ppl Cpl airplan career news
चौकट मोडताना: अनुभवानंतरचे शहाणपण
parents children self reliant chaturang article
सांदीत सापडलेले : काळजी
Success Story ramesh babu Inspirational journey
Success Story : सलून व्यवसाय ते ४०० गाड्यांचा मालक होण्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास; आमिर खान, अमिताभ बच्चन यांनाही दिली कार सेवा
Itishri Expanding Horizons and Obstructing Frames
इतिश्री: विस्तारणारं क्षितिज आणि अडवणाऱ्या चौकटी
Numerology: Why People Born on 9, 18, and 27 Tend to Be Angry and Cause Self-Loss
‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांच्या नेहमी नाकावर असतो राग, रागाच्या भरात करतात स्वत:चे नुकसान

हेही वाचा : VIDEO : “एक होती इडली, ती होती चिडली; धावता धावता सांबारात जाऊन पडली” चिमुकल्याची कविता होतेय व्हायरल

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : धक्कादायक! भर दुकानात तरुणीचा विनयभंग, शरीराला स्पर्श करताच मदतीसाठी किंचाळली पण….; घटनेचा VIDEO व्हायर

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “म्हातारपणी खरी किंमत कळते” तर एका युजरने लिहिलेय, “तरुणपणी एकमेकांची किंमत नसते पण म्हातारपणी त्याची जाणीव नक्की होते. तेव्हा वेळ निघून गेलेली असते” आणखी एका युजरने लिहिलेय, “माझे वडील पण अशीच मदत करतात माझा आईला” आणि एका युजरने लिहिलेय, “ते नव्हे.. आजीची दहशत बघा” अनेकांना हा व्हिडीओ खूप आवडला असून या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.