Viral Video : दररोजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण आरोग्याकडे अजिबात लक्ष देत नाही. नियमित व्यायाम, पोषक आहाराच्या कमतरतेमुळे अनेकदा आपल्याला आरोग्याच्या समस्या उद्भवतात. पण निरोगी आयुष्यासाठी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. अनेकांना नियमित व्यायाम करावासा वाटतो, सकाळी उठून वॉकला जावसं वाटतं पण काही लोक वेळ मिळत नाही, असे कारण सांगतात.
काही लोक आळशी स्वभावामुळे व्यायाम वैगरे करणे टाळतात. अशा लोकांनी सध्या एक व्हायरल होणारा व्हिडीओ नक्की पाहावा. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक वृद्ध आजोबा व्यायाम करताना दिसत आहे. त्यांची इच्छाशक्ती पाहून कोणीही थक्क होईल. या वयात सुद्धा आरोग्याची काळजी घेणारे हे आजोबा अनेकांना प्रेरणा देत आहे. (an old man in 90s do exercise why youngsters give excuses inspirational video goes viral)
नव्वदीतही आजोबा करताहेत व्यायाम!
या व्हायरल व्हिडीओ एका घरातील आहे. व्हिडीओमध्ये एक वृद्ध आजोबा स्टेपर (यंत्र) वर व्यायाम करत आहे. ते अतिशय मन लावून व्यायाम करत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की त्यांचा नातू त्यांना विचारतो, “किती झाले अण्णा?” त्यावर आजोबा म्हणातात, “६२” नातू म्हणतो, “मस्त” त्यावर आजोबा पुढे म्हणतात, “७५ करतो” नातू म्हणतो, “७५ करा, संध्याकाळी वाटल्यास परत करा ७५” हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल. या व्हिडीओवर लिहिले, “अण्णा नव्वद ओलांडणार लवकरच, तुमचं काय?”
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
anirudh_j0shi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असूनया व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “अण्णा – द रिअल फिटनेस मॉडेल”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मस्त आजोबा” तर एका युजरने लिहिलेय, “आदर” आणखी एका युजरने लिहिलेय, “हा व्हिडीओ प्रेरणा देणारा आहे” एक युजर विचारतो, “हे यंत्र कोणते आहे, मला सुद्धा गरज आहे?” त्यावर नातवाने उत्तर दिले आहे, “डिकॅथलॉन स्टेपर” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. यापूर्वी सुद्धा वृद्धांचे असे अनेक व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहेत.